Dahi Handi 2024 Updates: दिवसभरातील दहीहंडी उत्सवाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Dahi Handi 2024 LIVE Updates in Marathi: कृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
Dahi Handi 2024 LIVE Updates
Dahi Handi 2024 LIVE UpdatesEsakal
Updated on

उत्सवाच्या माध्यमातून कलागुणांना वाव मिळाला- राम कदम

मी नियमांच पालन करतो, त्यामुळे दहाला दहीहंडीचा कार्यक्रम बंद केला आहे. भारतातील सर्वात मोठ्या दहीहंडीत उत्सवात समाजाला चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रगीतसुद्धा झालं आहे. घाटकोपर कलावंतांचा खजाना आहे, त्याला वाव देणार असल्याचं भाजप नेते राम कदम म्हणाले.

सात थरांची हंडी लावताना प्रभादेवी येथे गोविंदा जखमी

मुंबईतल्या प्रभादेवीच्या दहीहंडीमध्ये एक गोविंदा किरकोळ जखमी झाला आहे. सात थरांची हंडी लावताना कंबरेला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. नवी चिखलवाडी ग्रँड रोडच्या गोंविदा पथकाचा हा गोंविदा आहे.

मुंबईमध्ये ६३ गोविंदा जखमी, उपचार सुरु

मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान आतापर्यंत ६३ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Mumbai Dahihandi Live: भाऊ कदम यांची राम कदम यांच्या दहीहंडीला हजेरी

विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनी राम कदम यांच्या दहीहंडीला हजेरी लावली. भाऊ कदम आणि किरीट सोमय्या यांनी गाण्यावर डान्सदेखील केला.

गोरेगावमध्ये मनोरे रचताना थर कोसळून तीन महिला गोविंदा जखमी

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. सकाळपासूनच मुंबई शहरातील गल्लीबोळात आणि रस्त्यावर गोविंदा रे गोपाळा म्हणत पथके फिरत आहेत. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील ओबेराय मॉलमध्ये देखील दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा मान गोरेगाव येथील स्वस्तिक महिला गोविंदा पथकाला देण्यात आला. या पथकाकडून पाच थरांचे मानवी मनोरे रचत हंडी फोडण्यात आली हंडी फोडण्यासाठी थर रचत असताना थर कोसळल्यामुळे तीन महिला गोविंदा जखमी झाल्या. या जखमींवर ताबडतोब उपचार देखील करण्यात आले आहेत.

राम कदम यांच्या दहीहंडीला मंगलप्रभात लोढांची उपस्थिती

राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव सुरु आहे. राज्याचे कबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राम कदम यांच्या दहीहंडीला उत्सवात हजेरी लावली.

Mumbai Dahihandi Live: ठाकरे गटाकडून 'दहीहंडी निष्ठावंतांची २०२४'चे आयोजन

शिवसेना UBT दक्षिण विभाग क्रमांक 12 ने गोकुळाष्टमीच्या निमित्ताने 'दहीहंडी निष्ठावंतांची २०२४' चे आयोजन केलं आहे. या दहीहंडीला युवासेना प्रमुख, नेते आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

Thane Dahihandi Live: टेंभीनाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांसमवेत जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांची उपस्थिती

टेंभीनाका दहीहंडी उत्सवात फिल्मी सिताऱ्यांची मांदीयाळी. भिडू जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत केलं चाहत्यांचे अभिवादन

Thane Dahihandi Live: संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीसाठी गोळा झाली हास्यजत्रा

ठाणे येथील सुप्रसिद्ध संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला हास्य जत्रेच्या कलाकारांनी दिली भेट. प्रेक्षकांमध्ये उत्साह.

Dahi Handi Live: अमर चक्र गोविंदा पथकाने रचले 8 थर

अमर चक्र गोविंदा पथक मालवणीचा राजाने न्यु महाकाली नगर मालवणी मालाड पश्चिम येथील दहीहंडीत 8 थर रचले. अमर चक्र मालवणीचे सर्वात जुने आणि मोठे गोविंदा पथक आहे. या पथकाला मालवणीचा राजा म्हणून ओळखले जाते.

Jambhori Maidan Dahi Handi Live: जांभोरी मैदान दहीहंडीला देवेंद्र फडणवीसांची हजेरी

मुंबईतील जांभोरी मैदानात आयोजीत केलेल्या दहीहंडीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशिष शेलार यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

Thane Dahi handi Live: जय जवान गोविंदा पथक ठाण्यात दाखल, संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात देणार ९ थरांची सलामी

सुप्रसिद्ध जय जवान गोविंदा पथक ठाण्यात दाखल झाले असून ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात देणार ९ थरांची सलामी.

Kirit Somayya Dahi Handi Live: चार थर चढत किरीट सोमय्यांनी भांडुपमध्ये फोडली दहीहंडी

भांडुपमध्ये भाजप नेते दीपक दळवी यांनी आजोजीत केलेल्या दहीहंडीत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हजेरी लावात चार थर चढत हंडी फोडली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gautami Patil In Dahi Hnadi: प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीत थिरकली गौतमी पाटील

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणे दहीहंडी आयोजित केली आहे. या दहीहंडीला नृत्यांगना गौतमी पाटीलने हजेरी लावली होती. यावेळी ती विविध गाण्यांवर थिरकल्याचे पाहायला मिळाले.

Pune Dahihandi Live Update: बालेवाडीच्या दहीहंडीकडे चंद्रकांत पाटलांची पाठ, स्वप्नील कुसळेचा होणार होता सन्मान

आज पुण्यात त्यातही खास करून चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदार संघात होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला त्या हजेरी लावणार आहेत मात्र बालेवाडी मध्ये होणारे एका दहीहंडी उत्सवाला चंद्रकांत पाटील जाणार नसल्याचं त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नमूद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बालेवाडीतील या दहीहंडी उत्सवाला भारताचा आघाडीचा नेमबाज स्वप्निल कुसळे येणार आहे आणि या समस्त बालेवाडीतील ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभारलेला तब्बल पाच लाखांचा निधी धनादेश देऊन धनादेश तब्बल पाच लाखांच्या निधीचा धनादेश देऊन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कुसळे यांना सन्मानित केलं जाणार होतं.

Mumbai Dahihandi Celebration Live: मुंबईत दहीहंडी दरम्यान एकूण आतापर्यंत १५ गोविंदा जखमी

मुंबईत दहीहंडी दरम्यान एकूण १५ गोविंदा जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर सध्या विविध शासकीय, महापालिका आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात १, पोद्दार रुग्णालयात ४, केईएम रुग्णालयात १, नायर रुग्णालयात ४, सायन रुग्णालयात २, राजावाडी रुग्णालयात १, एमटी अग्रवाल रुग्णालयात १ आणि कुर्ला भाभा रुग्णालयात १ जखमी गोविंदावर उपचार सुरू आहेत

Thane Dahi Handi Live: पहिल्या प्रयत्नात 9 थर लावणाऱ्या पथकाला संकल्प प्रतिष्ठान देणार 11 लाखांचे बक्षिस

ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान पहिल्याच प्रयत्नात 9 थर लावणाऱ्या पथकाला 11 लाखांचे बक्षिस देणार आहे. दरम्यान आता दहीहंडीचा माहोल तयार झाला असून, हळूहळू लोकांची गर्दी जमत आहे.

Jai Jawan Pathak Live: भांडुपमध्ये जय जवान पथकाकडून नऊ थरांची सलामी

भांडुप मध्ये जय जवान पथकाकडून नऊ थरांची सलामी दिलेली आहे. चार एके लावून जय जवान पथकाने ही नऊ थरांची सलामी दिली. भांडुपमध्ये मनसेच्या दहीहंडीमध्ये जय जवान पथकाने हे थर लावले आहेत.

Ghatkopar Dahi Handi Live: भारतातील सगळ्यात मोठ्या घाटकोपर दहीहंडीला विविध कार्यक्रमांनी सुरुवात

मुंबई सह राज्यभरात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी होत आहे. भारतातील सगळ्यात मोठी दहीहंडी समजल्या जाणाऱ्या घाटकोपर मधील हंडीला विविध कार्यक्रमांनी सुरुवात झाली आहे. भाजप आमदार राम कदम या दहीहंडीचे आयोजन करतात.

CM Eknath Shinde Live: विविध दहिहंडी कार्यक्रमांना मुख्यमंत्री लावणार हजेरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजा मुंबई आणि परिसरातील विविध दहिहंडी कार्यक्रमांना लावणार हजेरी लावणार आहेत. याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ते दुपारी 12 वाजल्यानंतर टेम्भी नाका दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहतील. त्यानंतर ठाणे, घाटकोपर, कुर्ला, मागाठाणे, कांदिवली, मिरारोड पुन्हा ठाणे आशा विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहतील.

Ideal Dahi Handi Live: आयडीयल दंहीहंडी ठरणार खास, महिलांसह दिव्यांगांनाही मिळणार हंडी फोडण्याची संधी

यंदा दादरमधील याडीयल बुक डेपो चौकातील दहीहंडी खास ठरणार आहे. कारण ही दहीहंडी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. यावेळी इथे पर्यावरण संबंधीत विविध विषयांवर पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी पुरुषांसह महिला आणि दिव्यांगांसांठीही दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

Mumbai Dahi Handi Live: जॅाली स्पोर्ट क्लब महिला गोविंदा पथकाने फोडली मुंबईतील पहिली हंडी

विलेपार्ले येथील जॅाली स्पोर्ट क्लब महिला गोविंदा पथकाने मुंबईतील पहिली दहीहंडी फोडली आहे. आज देशासह राज्यभरात मोठ्या उत्साहात दहीहंडी सन साजरा होत आहे.

Lalbaug Dahi Handi Live: ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची दहीहंडी; फडणवीसांसह मराठमोळे सेलिब्रिटी लावणार हजेरी

शिवडी विधानसभेतील ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग येथे भाजपने यंदा पुन्हा दहीहंडीचे आयोजन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सह मराठमोळे सेलिब्रिटी याठिकाणी हजेरी लावणार आहेत.

विशेष म्हणजे भाजपच्या बड्या नेत्यांच्या पोस्टरसोबत याठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ही बॅनर झळकत आहेत.

Mumbi Dahi Handi Live: श्री सिद्धिविनायक मंदिरातील  हंडी फुटली, पाहा व्हिडिओ

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिरात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. एका चिमुकल्याच्या हस्ते हंडी फोडण्यात आली.

Krishna Janmashtami 2024 LIVE: सिद्धिविनायक मंदिरात जन्माष्टमी साजरी, पाहा व्हिडिओ

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात काल रात्री उत्साहात जन्माष्टमी सोहळा पार पडला.

Krishna Janmashtami 2024 LIVE: राजस्थानात भगवान श्रीकृष्णाला २१ तोफांची सलामी

राजस्थानातील राजसमंदमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात भगवान श्रीकृष्णाला २१ तोफांची सलामी देण्यात आली.

Happy Krishna Janmashtami Live: नागपूरात रंगला दहीहंडीचा सोहळ

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त नागपुरात 'बडकस चौक मित्र परिवाराच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्रीला पाळणा झुलला आणि गोविंदा पथकांच्या कान्होबासह क्रीडांना सुरुवात झाली. बडकस चौकात उंचावर लटकलेली दह्याची हंडी फोडण्याची चुरस गोविंदा पथकांमध्ये रंगली होती. नागपूरसह भंडारा,गोंदिया येथूनही गोविंदा पथके सहभागी झाली होती. अखेर नागपूरच्या जय भोले क्रीडा मंडळाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यात यश मिळवले होते.

Krishna Janmashtami 2024 LIVE: मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये दहीहंडीचा मोठा उत्साह

कृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.