Latest Marathi News Update: सुप्रिया सुळेंना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस

देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी राज्यभरात प्रचाराची राळ उठत आहे. दरम्यान निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील माढा, बारामती, सांगली, कोल्हापूर या जागांवर उद्या 7 मे रोजी मतदान होणार आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal
Updated on

सुप्रिया सुळेंना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस

निवडणूक प्रचार थांबलेला असतानाही सोशल मीडियाच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी प्रचार केला, असा आरोप अपक्ष उमेदवार संदीप देवकाते यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगानं ही नोटीस पाठवली होती.

वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार

निवडणूक आयोगाची चंद्राबाबू नायडूंना तंबी; CM जगन मोहन यांच्यावर केली होती टीका

मुंबई: हिंदुजा रुग्णालयात आग; अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल

फडणवीसांनी घेतली गणेश नाईकांची भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक यांची भेट घेतली. त्यांचे पुत्र संजीव नाईक यांना ठाण्यातून उमेदवारी न दिल्यानं नाईक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार संदीप देवकाते यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रचाराची आज सांगता झाल्यानंतरही सुळेंनी आपल्या पक्षाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुप्रिया सुळेंनी आचारसंहितेचा भंग केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान उद्या होणार असून यापूर्वी रत्नागिरीत निवडणूक आयोगान मोठी कारवाई करत तीन कोटींची रोकड पकडली आहे.

 पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा;  मोहोळ यांचा करणार प्रचार

पुणे : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पुण्यात १० मे ला राज ठाकरे यांची सभा होणार आहे. पुणे शहरातील अलका चौकात ही सभा घेण्यात येणार आहे. १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ याच्या प्रचारार्थ सभा घेण्यात येणार आहे

लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

नाशिक लोकसभा निवडणुकीत 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात असणार आहेत. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिकमध्ये पाच तर दिंडोरीत पाच उमेदवारांची माघार घेतली आहे. नाशिकमधून अपक्ष म्हणून लढत असलेल्या शांतिगिरी महाराजांना बादली, सिद्धेश्वर आनंद सरस्वती यांना संगणक तर जितेंद्र भावे यांना बॅट ही निशाणी मिळाली आहे

उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी डेहराडून येथील राज्य सचिवालयात राज्यातील जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.

या बैठकीला डीजीपी अभिनव कुमारही उपस्थित आहेत.

वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला होणार अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी आय बी खात्याला दिलेली होती. मुंबईतील दोन हॉटेलवर हल्ला करण्यासाठी बोट निघाली असून त्याचे अक्षांश आणि रेखांश असे आहेत अशी ईत्तमभूत माहिती अमेरिकन एजन्सीकडून मिळाली असतानाही ही माहिती मुंबई पोलीस महाराष्ट्र शासन यांना देण्याची जबाबदारी गुप्तचर संघटनेचे अधिकारी तत्कालीन अधिकारी प्रभाकर अलोक यांची होती.

मात्र खटला सुरू झाल्यानंतर आर.एस.एस आणि  एडवोकेट उज्वल निकम या दोघांनी मिळून त्यावेळच्या शासन आणि कोर्टाची ही दिशाभूल केली. त्यामुळे उज्वल निकम हे या सगळ्या बाबीसाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत. आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी करत 'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निकम यांच्यावर केलेले आरोप खरे असल्याचं म्हटल आहे.

कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा म्हणाले, "...माझ्या मते आम्ही 400 जागा जिंकणार आहोत. कर्नाटकात, किमान 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार आहोत. आम्ही आमच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. 28 लोकसभा मतदारसंघात राघवेंद्र 3 लाख मतांच्या फरकाने विजयी होणार आहेत."

अरुण रेड्डी यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अरुण रेड्डी यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपीने आपल्या वकिलामार्फत या प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना याप्रकरणी जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले. उद्या या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर केला आहे. गोयल हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत.

Lokshabha Elections 2024: पीएम मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही; अमित शाह यांचे वक्तव्य चर्चेत

बंगालमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "दीदींनी दुर्गापूरमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी 15 दिवसांपासून प्रचार केला आहे. त्या इथे 5 वर्षे राहू शकतात, पण दुर्गापूर जिंकू शकत नाहीत हे माझे आव्हान आहे. दीदींनी एक नवीन उद्योग सुरू केला आहे. इंडस्ट्रियल टाऊनमध्ये 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. काल रात्री झारखंडमध्ये एका मंत्र्याच्या घरातून 350 कोटी रुपये जप्त करण्यात आले. पीएम मोदी गेल्या 23 वर्षांपासून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आहेत आणि त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही"

Pune Crime News: कोंढव्यात वीस मिनिटांत दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

कोंढवा परिसरात चोरट्यांनी वीस मिनिटांत दोन महिलांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पिसोळीतील धर्मावत पेट्रोल पंपाजवळ ब्रुकफिल्ड सोसायटीजवळ आणि गोकुळनगरमधील व्यंकटेश सोसायटीसमोर हा प्रकार घडला आहे.

Lokshabha Elections 2024: भारतातील आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांचे अधिकार नरेंद्र मोदींना हिरावून घ्यायचे आहेत - राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "भारतातील आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांना राज्यघटनेने जल, जमीन आणि जंगलाचे अधिकार दिले आहेत. नरेंद्र मोदींना ते हिरावून घ्यायचे आहे. आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. भाजपच्या नेत्यांनी निवडणुका जिंकल्या तर संविधान बदलू, असे स्पष्टपणे सांगितले आहे, म्हणून त्यांनी 400 जागांचा नारा दिला आहे, त्यांना 150 जागाही मिळणार नाहीत."

Jharkhand ED Raid: संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू

झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सहाय्यक संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत 20 कोटींहून अधिकची मोजणी झाली आहे.

RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

9 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेविरोधात सामाजिक संस्थेची हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

शाळांना दिलेल्या या सवलतीमुळे सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणाला तडा जात असल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आला होता.

1 किमी. च्या जवळपास खासगी व अनुदानित शाळांत दुर्बल घटकांतील 25% विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सक्ती असणार नाही असा नवीन नियम राज्य सरकारकडून करण्यात आला होता त्याला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.

साल 2024-25 च्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन प्रवेशाची मुदत 10 मेपर्यंत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे कायद्यातील सुधारणा तूर्तास लागू होणार नाही मनसे नेते अमित ठाकरे यांनी सुद्धा या नियमाला  विरोध केला होता.

हेमंत करकरेंविषयी वडेट्टीवर यांनी केलेल्या वक्तव्यावर शशी थररू यांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पुण्यात बोलताना सांगितले की विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांची गंभीररित्या चौकशी करण्यात यावी असे मत व्यक्त केलं.

दिंडोरीमधून जे.पी. गावित यांनी उमेदवारी घेतली मागे

दिंडोरीमधून जे.पी. गावित यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर मिळाले

दोन BDDS टीम आणि सीआरपीएफचे दोन युनिट यांनी मिळून गडचिरोली येथील तिपागड येथे सर्च ऑपरेशन राबवले. यात आज विस्फोटकांनी भरलेले सहा प्रशर कुकर सापडले असून डेटोनेटर्स आणि विस्फोटकांनी भरलेल्या तीन पाईप देखील मिळाल्या आहेत.

नाशिक लोकसभा निवडणूक २०२४ 

भारत आदिवासी पार्टीचे शिवाजी बर्डे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. भाजप शांतिगिरी महाराज यांनी माघार घ्यावी यासाठी मन धरणी करत आहे.

बंगालमध्ये स्फोटात दोन मुलं गंभीर जखमी 

पश्चिम बंगालमधील टीना नेताजी कॉलनीत झालेल्या स्फोटात दोन मुलं गंभीररित्या जखमी झाली आहे. हा स्फोट कशामुळं झालं याचा उलगडा अजून झालेला नाही. ही दोन मुलं खेळत होती त्या ठिकाणी हा स्फोट झाला आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उभ्या असलेल्या अभिनेत्री कंगना रणौत यांनी बॉलीवूड सोडणार असल्याचं म्हटलं आहे. निवडून आले तर पूर्णवेळ राजकारण करेल, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.

पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

''उत्तरभारतीय समाजाची भावना समजावी यासाठी मी पत्र लिहिलं होतं, मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या पत्राचा विचार केला यामुळे मी दिलेला राजीनामा मागे घेत आहे.'' अशी भूमिका नसीम खान यांनी स्पष्ट केली.

नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

नाशिकमध्ये असलेल्या कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्मिशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

१० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

ओडिशातल्या बेहरामपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, 4 जून ला बीजेडी सरकारची मुदत संपणार आहे. 4 जूनला भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा घोषित केला जाईल. 10 जूनला भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा भुवनेश्वरमध्ये होणार आहे, मी तुम्हा सर्वांना भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यासाठी आलो आहे.

पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

ओडिशातल्या गंजम जिल्ह्यातील बेहरामपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला सुरुवात झाली आहे.

Pune Metro: पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

पुण्यात एप्रिल महिन्यात मार्चच्या तुलनेत प्रवाशांची मोठी वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये दररोज सरासरी 80 हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे.

Nashik ICICI Bank: नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

नाशिकमधील गंगापूर रोडवरील आयसीआयसीआय बँकेत चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिती असलेल्यांनी चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Voting: मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन होणार स्वागत

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या तिसऱ्या टप्प्यातील जागांवर मतदान होणार आहे.

ED Raid In Jharkhand: ग्रामीण विकास मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

अंमलबजावणी संचालनालय रांचीमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. वीरेंद्र राम प्रकरणात झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्या घरगुती कर्मचाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली.

Fire in Ghaziabad: गाझियाबादमध्ये अग्नितांडव

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील साहिबााबाद साइट 4 इंडस्ट्री एरियामधील एका कारखान्यात आग लागली. अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता काल (ता. ५) रोजी सायंकाळी सहा वाजता झाली आहे. आता उद्या माढा, बारामती, सांगली कोल्हापूरसह 11 हायव्होल्टेज जागांवर मतदान होणार आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. करंजकर हे नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे यांना संधी दिली आहे.

यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...

ठाकरे गटाला धक्का, विजय करंजकर शिंदेंच्या शिवसेनेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे (यूबीटी) नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.