Loksabha 2024: निवडणूक काळात चार्टर्ड विमाने, हेलिकॉप्टरला डिमांड; जाणून घ्या तासाला किती रुपये देताहेत तुमचे आवडते पक्ष

Chartered Planes And Helicopters: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, सत्ताधारी भाजपने विमान/हेलिकॉप्टरवर एकूण 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता.
Political Parties Expenses On Helicopter And Chopper
Political Parties Expenses On Helicopter And ChopperEsakal
Updated on

Political Parties Expenses On Helicopter And Chopper:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी राजकीय नेते आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींचे देशभर दौरे सुरू आहेत.

दरम्यान, चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे चार्टर्ड सेवा पुरवठादारांनीही तासिका दर वाढवले ​​आहेत. चार्टर्ड विमानासाठी 4.5-5.25 लाख रुपये आणि हेलिकॉप्टरसाठी 1.5-3.5 लाख रुपये आकारले जात आहेत.

यंदा मागील निवडणुकीच्या तुलनेत मागणी जास्त आहे. मागणीनुसार खासगी विमाने आणि हेलिकॉप्टर कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.

रोटरी विंग सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष (पश्चिम क्षेत्र) कॅप्टन उदय गेली यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरची मागणी सामान्य दिवसांच्या तुलनेत 25 टक्क्यांनी जास्त आहे. राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत.

Political Parties Expenses On Helicopter And Chopper
Sangli Lok Sabha : ठरलं! सांगलीतून विशाल पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; शिवसेनेसह मविआचं वाढवलं टेन्शन

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये हेलिकॉप्टरचा अधिक वापर होताना दिसत आहे.

दरम्यान, बिझनेस एअरक्राफ्ट ऑपरेटर्स असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन आरके बाली म्हणाले की, निवडणुकीच्या वेळी सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरसाठी 1.5 लाख रुपये आणि ट्विन-इंजिन हेलिकॉप्टरसाठी 3.5 लाख रुपयांपर्यंत दर आहेत.

सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात लोक बसू शकतात, तर ट्विन-इंजिन हेलिकॉप्टरमध्ये 12 लोक बसू शकतात.

Political Parties Expenses On Helicopter And Chopper
'या' निष्ठावंत शिलेदाराला खंबीर पाठबळ देण्यासाठी शरद पवार आज साताऱ्यात; मविआतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शनाचे नियोजन

2019 च्या लोकसभा निवडणुकीत, सत्ताधारी भाजपने भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) सादर केलेल्या पक्षाच्या वार्षिक लेखापरीक्षित खात्यांनुसार, विमान/हेलिकॉप्टरवर एकूण 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता.

दुसरीकडे, काँग्रेस पक्षाने याच कालावधीत प्रवासात 126 कोटी रुपये खर्च केले. तथापि, पक्षाने विमान/हेलिकॉप्टरच्या खर्चाचा स्वतंत्रपणे उल्लेख केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.