Satara Lok Sabha : साताऱ्यात चुरशीने 63.07 टक्के मतदान; प्रतिष्ठेच्या लढतीत कोण मारणार बाजी?

सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघात आज अंदाजे ६३.०७ टक्के मतदान झाले.
Satara Lok Sabha constituency
Satara Lok Sabha constituencyesakal
Updated on
Summary

सातारा लोकसभा मतदारसंघात यावेळेस उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) अशी चुरशीची व प्रतिष्ठेची लढत आहे.

सातारा : सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघात आज अंदाजे ६३.०७ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान कोरेगाव विधानसभा (Koregaon Assembly) मतदारसंघात झाले, तर सर्वात कमी मतदान पाटण मतदारसंघात झाले आहे.गत पोट निवडणूकीच्या तुलनेत यावेळी घटलेली मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा रंगली आहे. एकूण १८ लाख ८९ हजार ७४० मतदारांपैकी ११ लाख, ९१ हजार ८६९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. काही किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासह १६ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रांत बंद झाले. आता थेट २८ दिवसांनी (चार जूनला) साताऱ्याचा खासदार कोण होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. चार जूनला निकाल जाहीर होणार आहे.

Satara Lok Sabha constituency
Kolhapur : नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापुरात चुरशीने 71 टक्के, तर हातकणंगलेत 68.07 टक्के मतदान; निकाल 4 जूनला

सातारा लोकसभा मतदारसंघात यावेळेस महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) अशी चुरशीची व प्रतिष्ठेची लढत आहे. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष या लढतीकडे लागले असून, या प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. एकीकडे छत्रपतींच्या घराण्याचे वंशज विरुद्ध सर्वसामान्य उमेदवार अशा या लढतीत सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता आहे.

त्यासाठी आज जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील २३१५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया झाली. सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली. विशेष म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांनी कुटुंबासह एकत्र जाऊन सकाळी सात वाजून सात मिनिटांनी अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांच्यासमवेत राजमाता कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले उपस्थित होते.

Satara Lok Sabha constituency
रामराजेंपासून उदयनराजेंपर्यंत.. सातारा-माढा मतदारसंघात राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

सुरुवातीला धिम्या गतीने; पण दहानंतर मतदानाचा वेग वाढला. सकाळी सात ते नऊ यावेळेत सात टक्के मतदान झाले होते. सकाळी अकरापर्यंत १८.८५ टक्के मतदान झाले होते. यामध्ये सातारा विधानसभा मतदारसंघाने आघाडी घेतली होती. दुपारी एकनंतर उन्हाचा कडका वाढूनही अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनीही कुटुंबासह ल्हासुर्णे येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्या समवेत पत्नी वैशाली शिंदे, तेजस शिंदे, साहिल शिंदे उपस्थित होते.

दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाचा आकडा वाढून तो ३२.७८ टक्क्यांवर पोचला. दुपारनंतर पुन्हा मतदानाचा वेग मंदावला होता. उन्हाचा तडाखा सहन करत मतदारांनी केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. कोरेगाव मतदारसंघात सर्वाधिक ३३.९३ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर पुन्हा मतदानाचा वेग वाढला. दुपारी तीन वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात ४३.८३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये सर्वाधिक मतदान कऱ्हाड दक्षिणेत ४६.३८ टक्के झाले होते, तर सर्वात कमी मतदान पाटणमध्ये ४१.७४ टक्के झाले होते. दुपारी चारनंतर पुन्हा मतदानाचा जोर वाढला होता. त्यामुळे पाच वाजेपर्यंत ५४.१ टक्के मतदान झाले होते.

Satara Lok Sabha constituency
Satara Lok Sabha : 'शरद पवारांकडून उमेदवारी मिळालेला नेता विजयी होणार'; माजी सहकारमंत्र्यांना विश्वास

यामध्ये कोरेगाव मतदारसंघातून सर्वाधिक ५७.२१ टक्के मतदान झाले होते, तर पाटणला सर्वात कमी ५०.३ टक्के मतदान झाले. उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर मतदारांनी केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. सायंकाळी सहानंतरही काही मतदान केंद्रांवर रांगा दिसत होत्या. सायंकाळी सहापर्यंत सुमारे ६३.०७ टक्के मतदान झाले होते. सातारा लोकसभा मतदारसंघातील १८ लाख ८९ हजार ७४० मतदारांपैकी ११ लाख ९१ हजार ८६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी अशी आहे. वाई ६०.७८, कोरेगाव ६७.५१, कऱ्हाड उत्तर ६५.३३, कऱ्हाड दक्षिण ६५.६८, पाटण ५६.५०, सातारा ६२.७७

दृष्टिक्षेपात...

  • साताऱ्यात अनेकांची मतदार यादीतील नावेच गायब

  • खोडशीत मतदानावर ग्रामस्थांचा बहिष्कार

  • म्हसवडला मतदान कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा त्रास

  • १६ ठिकाणी मतदान यंत्रे बदलावी लागली

  • डफळवाडी ग्रामस्थांचा बहिष्कार सहा तासांनंतर मागे

  • यादीत नाव नसल्याने शिरवडेत मतदारांमध्ये नाराजी

Satara Lok Sabha constituency
Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

लोकशाहीच्या या उत्सवात चांगले प्रतिनिधी लोकसभेत पोचणे आवश्यक असते. लोकांच्या आकांक्षा ठरविणारा हा दिवस आहे. जे जनतेच्या मनात असेल त्यालाच कौल मिळेल आणि अर्थातच मी जनतेच्या मनात आहेच. त्यामुळे बहुमत आपल्यालाच मिळणार आहे.

- खासदार उदयनराजे भोसले (भारतीय जनता पक्ष)

राजकारणात आलो तेव्हापासून संघर्षातूनच विजय मिळविला आहे. मला संघर्ष नवीन नाही; पण प्रत्येक वेळी मला लोकांची साथ मिळाली आहे. विरोधकांकडे जनतेला सांगण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे त्यांनी माझ्यावर आरोप केले असले, तरी जनतेचे प्रेम माझ्यासोबतच आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे.

- शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.