RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Lok Sabha Elections 2024: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसंघाचे कौतुक केल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक केले आहे.
Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024esakal
Updated on

Lok Sabha Elections 2024:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केल्यानंतर आता दिग्विजय सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक केले आहे. योगी आदित्यनाथ हे प्रामाणिक प्रतिमेचे नेते असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या महारजगंज लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना दिग्विजय सिंह यांनी योगींचे कौतुक केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा भ्रष्ट मोदी कुटुंबात समावेश करु नये. ते प्रामाणिक नेते आहेत. भाजप बुलडोझर संस्कृतीचे पालनपोषण करणारे आहेत. त्यांनी मंदिरे पाडल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केली.

काँग्रेस कधीच मंदिरांवर बुलडोझर फिरवत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र वाराणसी आणि गुजरातच्या मंदिरांवर भाजपने बुलडोझर चालवला. खोट्याचा कारखाना चालवणारे नरेंद्र मोदी भाजपकडे अशी वॉशिंग मशीन असल्याचे सांगतात, अशी टीका देखील दिग्विजय सिंह यांनी केली आहे.

Lok Sabha Elections 2024
पूर्वांचलचा बालेकिल्ला राखणे भाजपसाठी ठरणार मोठे आव्हान

दिग्विजय सिंह म्हणाले, भाजपचे डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांना पायदळी तुडवत आहे. भाजपला संविधान बदलायचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. मात्र आपल्या उद्योगपती मित्रांचे लाखो कोटी रुपये माफ केले. त्यामुळे महागाई वाढली असून त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

दिग्विजय सिंह निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेशच्या महाराजगंज लोकसभा मतदारसंघात गेले होते.  त्यांनी काँग्रेस उमेदवार वीरेंद्र चौधरी यांच्या समर्थनार्थ प्रचार केला. याआधी काँग्रेस नेत्याने लखनऊमध्ये पत्रकार परिषदेत संघ परिवाराचेही कौतुक केले होते आणि संघ परिवाराच्या प्रामाणिकपणावर शंका नाही पण मोदी परिवाराच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वांनाच माहिती असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

Lok Sabha Elections 2024
लक्षवेधी लढत : रांची (झारखंड) काँग्रेसच्या युवा चेहऱ्याचा निभाव लागणार का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.