Sharad Pawar: बारामती लोकसभा निवडणुकानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल मुंबईत रोड शो झाला, सभा देखील झाल्या मात्र यात अजित पवार कुठेच दिसले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आज नाशिक येथे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या अनुपस्थितीवर माहिती दिली.
अजित पवार आजारी असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार आमने-सामने होते. प्रचाराच एकमेकांवर टीका देखील करण्यात आली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रीया सुळे, अशी लढत बारामतीत होती. ७ तारखेला मदतान देखील झाले. तेव्हापासून अजित पवार बाहेर पडले नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शरद पवार यांनी राज ठाकरे यांना देखील टोला लगावला. शरद पवार यांनी आधी पक्ष फोडले आता त्यांचा पक्ष फुटला असे राज ठाकरे सभेत म्हणाले होते. यावर शरद पवार त्यांना टोला लगावला. राज ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय स्थान आहे हे मला माहित नाही. मी असं एकलं नाशिक हा त्यांचा बेस आहे. मात्र ते इथं हल्ली दिसत नसल्याचे पवार म्हणाले.
बारामतीमधील मतदानानंतर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार आम्हाला संपवायचे आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यानंतर भाजप आणि अजित पवार असा सामना रंगला होता. चंद्रकांत पाटील यांना बारामती प्रचारापासून देखील दूर ठेवण्यात आले होते.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. मोदींच्या रोड शो मुळे मुंबईकरांना त्रास झाल्याचे पवार म्हणाले. आत्मविश्वास संपल्यामुळे ते जाती-धर्मावर बोलत असल्याचे पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.