मुंबई : शिरुरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. दिलीप मोहिते पाटील यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली. मोहिते आणि अजित पवार यांच्यात नुकतीच बैठक पार पडली, यानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. अजित पवारांच्या विनंतीचा आपण मान राखणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Ajit Pawar nominated Shivaji Adhalrao Patil from Shirur Loksabha Constituency says Dilip Mohite)
माध्यमांशी बोलताना मोहिते म्हणाले, "आढळराव आणि आमच्यामध्ये जो संघर्ष होता, तो अतिशय पराकोटीचा संघर्ष होता याचा माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला होता. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनात आढळरावांसोबत जाण्याबाबत अनेक शंका-कुशंका होत्या. त्यांच्या मनातील हा संभ्रम अजित पवारांनी दूर करावा यासाठी त्यांच्यासोबत आम्ही बैठक घेतली. माझ्या घरीच ही बैठक पार पडली. यावेळी अगदी मनमोकळेप्रमाणं त्यांच्याशी कार्यकर्त्यांसह चर्चा झाली" (Marathi Tajya Batmya)
आढळराव पाटील यांची राजकीय कारकीर्द आंबेगाव तालुक्यात सुरु झाली. याठिकाणी वळसेपाटलांचा त्यांच्याशी कायम संघर्ष राहिला होता. पण वळसे पाटलांनी यामध्ये स्वतःची भूमिका बदलली आहे. त्यामुळं मलाही यात काही वाटत नाही, शेवटी पक्षासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. आज मी जो कोणी आहे तो केवळ अजित पवारांमुळं आहे. (Latest Marathi News)
जर अजित पवार हे माझे कुटुंब प्रमुख असतील तर मला त्यांचं ऐकावं लागेल. यापूर्वी मी म्हटलं होतं की, पक्ष जरी आढळरावांसोबत गेला तरी मी जाणार नाही. पण आता अजित पवारांनी माझ्या कार्यकर्त्यांसह सर्वांशी मनमोकळी चर्चा केली. त्यामुळं मी तडजोड करायला तयार आहे.
शिरुरमधून आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे. पण समोरुन कोण उभं राहणार आहे याची मला कल्पना नाही. पण पुन्हा एकदा शिरुर लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत होईल हे आपल्याला पहायला मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.