Akola loksabha constituency : काँग्रेसमुळे आंबेडकरांचे ‘टेन्शन’ वाढले

अकोला लोकसभा निवडणुकीकडे यंदा संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते व उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर हे सलग ११ व्यांदा महाविकास आघाडी पराभवाचा झटका देते की तारते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
Akola loksabha constituency
Akola loksabha constituencysakal
Updated on

अकोला लोकसभा निवडणुकीकडे यंदा संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते व उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर हे सलग ११ व्यांदा महाविकास आघाडी पराभवाचा झटका देते की तारते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेससोबत बोलण्याचे संकेत दिल्याने काँग्रेसचा उमेदवार रिंगणात राहतो की नाही याबाबत कोडेच आहे.

दुसरीकडे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्याविरोधात दस्तरखुद्द भाजपचेच माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी बंडखोरी केली असून ते चार एप्रिलला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या या निर्णयाने भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला असून वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढण्यात व्यस्त आहेत.

यंदाची अकोला लोकसभा निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार असल्याचे दिसते. भाजपने या मतदारसंघातून खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांची उमेदवारी दिली. कॉँग्रेसच्या घराणेशाहीला विरोध करणाया भाजपने इथून खासदारपुत्रालाच उमेदवारी दिल्याने भाजपला या प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीसोबत आघाडी होण्याची शक्यता धूसर झाल्यानंतर ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही येथून आपला अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसतर्फे डॉ.अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनुप धोत्रे व डॉ. अभय पाटील हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. तर अकोला हा प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत मतदारसंघ असून येथून त्यांनी दोनदा (१९९८ आणि १९९९) लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. पण, इतर सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

Akola loksabha constituency
Loksabha Election 2024 : मतदानासाठी शाईचा महापुरवठा ; ‘म्हैसूर पेंट्स व व्हार्निश’ कंपनीला काम

सरळ लढतीची आंबेडकरांना भीती

महाविकास आघाडीत सहभागी होऊन अकोला मतदारसंघात भाजप विरोधात एकास एक लढतीत विजयाची शक्यता कमी तर बदललेल्या राजकीय समीकरणात तिरंगी लढतीत विजयाची शक्यता अधिक वाटत असल्यानेच ॲड. प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली. अकोला मतदारसंघात १९८४ पासून झालेल्या १० लोकसभा निवडणुकीत ॲड. आंबेडकर निवडणूक रिंगणात होते.

पवारांनी दिला होता आदेश

१९९८ व १९९९ मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर प्रकाश आंबेडकर विजयी झाले होते. १९९८ मध्ये शरद पवार यांनी अकोल्यात मुक्कामी थांबून प्रकाश आंबेडकरांना विजयी करण्याचा पदाधिकाऱ्यांना अादेश दिल्याने ते ३२,७८२ एवढ्या कमी मताधिक्याने का होईना विजयी होऊ शकले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढून डॉ. संतोष कोरपे यांना उमेदवारी दिली. त्यांना सव्वा लाखाच्या जवळपास मते मिळाली. तरी सुद्धा अॅड. आंबेडकर ८,७१६ एवढ्या कमी मताधिक्याने विजयी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.