Navneet Rana: 'तुमचा परिवार किती लोकांचा' याचाही माझा अभ्यास...नवनीत राणा यांची तयारी पक्की, केला मोठा दावा 

Navneet Rana : . नवनीत राणा अमरावतीच्या विद्यमान खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार म्हणून जागा जिंकली होती. यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Navneet Rana
Navneet Ranaesakal
Updated on

Navneet Rana : लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहे. भाजपने अमरावतीमधून भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. नवनीत राणा अमरावतीच्या विद्यमान खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार म्हणून जागा जिंकली होती.

यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. व भाजपच्या तिकीटावर लढत आहे. अमरावतीत त्यांच्यासमोर कडवे आव्हान असणार आहे. बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष आणि काँग्रेसने अमरावतीत उमेदवार दिला आहे.

सकाळ माध्यम समुहाचे संपादक सम्राट फडणीस यांनी नवनीत राणा यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, निकाल काय लागले याचा वितार त्या करत नाहीत. मी माझे 200 टक्के दिले. गेल्या 10 वर्षापासून मी माझे 20 चक्के दिले आहेत.

आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघात माझा खूप अभ्यास आहे. तुमचा परिवार किती लोकांचा, तुमची सुन कुठली आहे. तुमची मुलगी कुठं गेली, तिला किती मुलं आहेत. त्यांचा नवरा काय करतो, याचा देखील माझा अभ्यास आहे. माझे परिश्रम लोकांनी पाहीले आहेत. असे नवनीत राणा म्हणाल्या.

Navneet Rana
Bank Disinvestment: मोदी सरकार 'या' 5 सरकारी बँकांमधील हिस्सा विकण्याच्या तयारीत; काय आहे प्लॅन?

नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल चढवला. त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे आपल्याला संकट म्हणून मिळाले होते. ३३ महिने मुख्यमंत्री असताना ते घरातून बाहेर पडले नाहीत. त्यामुळे हनुमान चालिसाचे पठण करणे हा माझा उद्देश होता. मी फक्त एक शब्द बोलले होते, एक शब्द बोलल्यानंतर एवढा कोप माझ्यावर येईल असा विचार मी स्वप्नात केला नव्हता. 

Navneet Rana
Baba Ramdev: माफीचा आकार जाहिराती एवढा मोठा होता का? बाबा रामदेवांना सर्वोच्च न्यायालयाचा सवाल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.