Anandraj Ambedkar: अमरावतीतून आनंदराज आंबेडकर मैदानात, शक्तीप्रदर्शनासह दाखल केला अर्ज

Amaravati Loksabha: आनंदराज आंबेडकर ही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे वंचित येथून आपला उमेदवार मागे घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Amaravati Loksabha
Amaravati LoksabhaEsakal
Updated on

रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरांनी आज अमरावतीतून लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे भाऊ आहेत.

आता आंबेडकर यांच्या एन्ट्रीने अवतीची निवडणूक खऱ्या अर्थाने तिरंगी होणार असे म्हणता येईल. कारण येथून भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना आपल्या पक्षाकडून तिकीट दिले आहे. तर काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान या मतदारसंघातून वंचितने आधीच प्राजक्ता पिल्लेवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज भरल्यामुळे पिल्लेवार यांना थांबण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com