Mahayuti : राष्ट्रवादी काँग्रेस ‘महायुती’चा लाभार्थी ; शिवसेनेची तातडीची बैठक होणार

महायुतीत शिवसेनाला न्याय मिळायला हवा, ही भावना लक्षात घेत उरलेल्या जागांवर न्याय कसा मिळवता येईल, उमेदवार बदलणे कुठे आवश्यक आहे, यावर विचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. उद्या (ता. ६) रोजी शिवसेनेचे प्रमुख नेते चर्चा करणार आहेत.
Mahayuti
Mahayutisakal
Updated on

मुंबई : महायुतीत शिवसेनाला न्याय मिळायला हवा, ही भावना लक्षात घेत उरलेल्या जागांवर न्याय कसा मिळवता येईल, उमेदवार बदलणे कुठे आवश्यक आहे, यावर विचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. उद्या (ता. ६) रोजी शिवसेनेचे प्रमुख नेते चर्चा करणार आहेत.

ठाणे, नाशिक, रत्नागिरी, कल्याण तसेच मुंबईतील दोन जागांवर अद्याप निर्णय व्हायचा आहे. भाजपने या जागांबाबत केलेले मूल्यमापन शिंदे यांना पटणारे आहे. मात्र कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सखोल विश्लेषण करत त्यांची बाजू मांडणे आणि काही जागांबाबत सविस्तर समजावून सांगणे असे दुहेरी काम शिंदे यांना करायचे असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाने ‘सकाळ’ला सांगितले.

भाजपबद्दल आमच्या कार्यकर्त्यांना काही आक्षेप आहेतच, पण राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या जागांबद्दल भावना तीव्र असल्याचे मत आहे. पक्ष फुटला त्यावेळी एकमेव खासदार सुनील तटकरे हे अजित पवार यांच्यासमवेत बाहेर पडून महायुतीत सहभागी झाले होते. रायगड हा एकमेव लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या हाती होता. जागावाटपात मात्र शिवसेना वर्षानुवर्षे लढवत असलेले मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहेत.

उस्मानाबाद, परभणी हे शिवसेनेने जिंकलेले मतदारसंघ या वेळी अजित पवार गटाला मिळाले आहेत. बारामती या लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार उभा राहत असे. यावेळी ती जागा ‘राष्ट्रवादी’ला मिळाली आहे. जागा वाटपात अजित पवार गटासाठी शिंदे गटाला सर्वाधिक त्याग करावा लागला आहे, याकडेही लक्ष वेधले

Mahayuti
Sangli Loksabha Constituency : ‘सांगलीत मैत्रीपूर्ण लढत नाही’ ;विशाल पाटील यांच्यासाठी राज्यसभेचा प्रस्ताव

जात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी समजुतीचा सूर आळवू, असे शिंदे गटाला सांगितल्याचे समजते. बारामती हा आतापर्यंत आम्ही लढवलेला लोकसभा मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’कडे सोपवला आहे. युतीत काही त्याग करावे लागतात. राणा जगजितसिंह भाजपचे नेते; मात्र त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी युतीधर्म लक्षात घेत उस्मानाबादसाठी अजित पवार गटात प्रवेश केला. असे घडू शकते, असे सांगितले जाते. नाशिकचा मतदारसंघही आता ‘राष्ट्रवादी’कडे जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.