Loksabha Election 2024 : आत्तापर्यंत ६१ उमेदवार घोषित, २६ लढती निश्चित

विविध राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली असली तरी अद्याप अनेक जागांवरील उमेदवार घोषित व्हायचे असून काही जागांवरील घोळही मिटलेले नाहीत. भारतीय जनता पक्षाने २४, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने १७, काँग्रेसने १२ आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने आठ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal
Updated on

मुंबई : विविध राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली असली तरी अद्याप अनेक जागांवरील उमेदवार घोषित व्हायचे असून काही जागांवरील घोळही मिटलेले नाहीत. भारतीय जनता पक्षाने २४, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने १७, काँग्रेसने १२ आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने आठ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही आपल्या आठ उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांच्या उर्वरित उमेदवारांची घोषणा येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. आजवर झालेल्या घोषणा आणि उमेदवारांची निश्चिती पाहता ४८ पैकी २६ लढती स्पष्ट झाल्या आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारींनुसार मावळ, हिंगोली, बुलढाणा, दक्षिण मुंबई आणि शिर्डी या पाच ठिकाणी दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये लढत होईल, तर बारामती आणि शिरूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समोरासमोर असतील.

निश्चित झालेल्या २६ लढती पुढीलप्रमाणे

अहमदनगरः सुजय विखेपाटील (भाजप) विरूध्द नीलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार), अकोलाः अनुप धोत्रे (भाजप) विरूध्द प्रकाश आंबेडकर (वंचित), अमरावतीः नवनीत राणा (भाजप) वि. बळवंत वानखेडे (काँग्रेस), बारामतीः सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी अजित पवार) वि. सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार), भंडारा गोंदियाः सुनील मेंढे (भाजप) वि. प्रशांत पडोले (काँग्रेस), बुलढाणाः प्रतापराव जाधव (शिवसेना -शिंदे) वि. नरेंद्र खेडेकर (शिवसेना-ठाकरे), चंद्रपूरः सुधीर मुनगंटीवार (भाजप) वि. प्रतिभा धानोरकर (काँग्रेस), गडचिरोली चिमूरः अशोक नेते (भाजप) वि. डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस), हातकणंगलेः धैर्यशील माने (शिवसेना शिंदे) वि. राजू शेट्टी (स्वाभिमानी पक्ष), हिंगोलीः हेमंत पाटील वि. (शिवसेना-शिंदे) वि. नागेश पाटील अष्टीकर (शिवसेना- ठाकरे), कोल्हापूरः संजय मंडलिक (शिवसेना-शिंदे) वि. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (कॉँग्रेस), लातूरः सुधाकर श्रुंगारे (भाजप) वि. शिवाजीराव काळगे (काँग्रेस), मावळः श्रीरंग बारणे (शिवसेना- शिंदे ) वि. संजोग वाघेरे (शिवसेना-ठाकरे), नागपूरः नितीन गडकरी (भाजप) वि. विकास ठाकरे (काँग्रेस), नांदेडः प्रतापराव चिखलीकर (भाजप) वि. वसंतराव चव्हाण (काँग्रेस), उत्तर पूर्व (ईशान्य)ः मिहीर कोटेचा (भाजप) वि. संजय दिना पाटील (शिवसेना - ठाकरे), दक्षिण मध्यः राहुल शेवाळे (शिवसेना-शिंदे) वि. अनिल देसाई (शिवसेना-ठाकरे), नंदूरबारः हीना गावित (भाजप) वि. गोवल पाडवी (काँग्रेस), परभणीः महादेव जानकर (रासप) वि. संजय जाधव (शिवसेना-ठाकरे), पुणेः मुरलीधर मोहोळ (भाजप) वि. रवींद्र धंगेकर (काँग्रेस), रायगडः सुनील तटकरे (राष्ट्रवादी-अजित पवार) वि अनंत गीते (शिवसेना - ठाकरे), रामटेकः राजू पारवे (शिवसेना - शिंदे) वि. श्यामकुमार बर्वे (काँग्रेस), शिर्डीः सदाशिव लोखंडे (शिवसेना-शिंदे)वि. भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना-ठाकरे), शिरूरः आढळराव पाटील (राष्ट्रवादी अजित पवार) वि. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी- शरद पवार), सोलापूरः राम सातपुते (भाजप) वि. प्रणिती शिंदे (काँग्रेस), सांगलीः संजयकाका पाटील (भाजप) वि. चंद्रहार पाटील (शिवसेना - ठाकरे)

Loksabha Election 2024
Ashish Shelar : सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी जागावाटपावर वेळ

एकच उमेदवार जाहीर झालेले १८ उमेदवार पुढीलप्रमाणे :

अन्य मतदारसंघांमध्ये जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे अशीः औरंगाबाद - चंद्रकांत खैरे (शिवसेना - ठाकरे), बीड - पंकजा मुंडे (भाजप), भिवंडी - कपिल पाटील (भाजप), उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना - ठाकरे), धुळे - सुभाष भामरे (भाजप), दिंडोरी - भारती पोवार (भाजप), जळगाव - स्मिता वाघ (भाजप), जालना - रावसाहेब दानवे (भाजप), माढा - रणजितसिंह निंबाळकर (भाजप), उत्तर पश्चिम (वायव्य) - अमोल कीर्तीकर (शिवसेना - ठाकरे), मुंबई दक्षिण - अरविंद सावंत (शिवसेना – ठाकरे), मुंबई उत्तर - पीयूष गोयल (भाजप), नाशिक - राजाभाऊ वाजे (शिवसेना - ठाकरे), सिंधुदूर्ग - रत्नागिरी - विनायक राऊत (शिवसेना - ठाकरे), रावेर - रक्षा खडसे (भाजप), ठाणे - राजन विचारे (शिवसेना - ठाकरे), वर्धा - रामदास तडस (भाजप) आणि यवतमाळ - संजय देशमुख (शिवसेना - ठाकरे)

एकही उमेदवार जाहीर न झालेले मतदारसंघ असेः कल्याण, मुंबई उत्तर मध्य, पालघर आणि सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.