PM Modi Message: ध्यान संपलं... एक्झिट पोल जाहीर; PM मोदींचा देशाला उद्देशून संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारक इथं नुकतंच एक दिवसाची ध्यान साधना पार पडली. तर दुसरीकडं काही तासांपूर्वीच एक्झिट पोलही जाहीर झाले आहेत.
PM Modi
PM Modi
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारक इथं नुकतंच एक दिवसाची ध्यान साधना पार पडली. तर दुसरीकडं काही तासांपूर्वीच एक्झिट पोलही जाहीर झाले आहेत. या विविध पोल्समध्ये भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक संदेश दिला आहे. एका लिखित पत्राद्वारे त्यांनी हा संदेश दिला आहे. केंद्रीय मंत्री निर्मल सीतारामन यांनी मोदींचा हा संदेश शेअर केला आहे. (background of end of meditation and exit poll announced PM Modi message to nation)

काय म्हटलंय या संदेशात?

"भारताच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या कन्याकुमारी येथील 'विवेकानंद रॉक मेमोरियल'ला भेट देताना मला एक दैवी ऊर्जा जाणवते. याच खडकावर माता पार्वती आणि स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केलं होतं. पुढे एकनाथ रानडे यांनी या खडकाचे ‘शिला स्मारक’त रूपांतर केलं ज्यामुळं स्वामी विवेकानंदांचे विचार जिवंत केले गेले.

अध्यात्माच्या पुनरुज्जीवन करणारे आध्यात्मिक नेते स्वामी विवेकानंद हे माझे आदर्श असून माझी ऊर्जा आणि माझ्या अध्यात्माचे स्रोत आहेत. अनेक वर्षांपूर्वी, संपूर्ण देशाचा प्रवास केल्यानंतर, जेव्हा स्वामी विवेकानंदांनी इथं ध्यान केलं, तेव्हाच त्यांनी भारताच्या पुनरुत्थानासाठी एक नवीन दिशा दिली.

PM Modi
Chandrapur Exit Poll: सुधीर मुनगंटीवार यांचं काय होणार? एक्झिट पोल सांगतोय धक्कादायक अंदाज

पंतप्रधान मोदींनी लिहिलंय की, "हे माझे भाग्य आहे की आज इतक्या वर्षांनंतर, भारतानं स्वामी विवेकानंदांच्या मुल्यांना आणि आदर्शांना मूर्त रूप दिल्यानं, मलाही या पवित्र ठिकाणी ध्यान करण्याची संधी मिळाली. पायाशी बसून 'मा भारती'च्या निमित्तानं मी पुन्हा एकदा माझा संकल्प जाहीर करतो की, माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि माझ्या शरीराचा प्रत्येक कण राष्ट्रसेवेसाठी समर्पित राहील"

देशाच्या प्रगतीसाठी आणि तेथील नागरिकांच्या कल्याणासाठी मी ‘मा भारती’ला विनम्र अभिवादन करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.