Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

Baramati Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 11 जागांसाठी आज मंगळवारी मतदान होणार आहे. यामध्ये बारामती लोकसभेच्या जागेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Baramati Lok Sabha Election 2024 election commission Instructions not to accept bank passbook as identity card
Baramati Lok Sabha Election 2024 election commission Instructions not to accept bank passbook as identity card Sakal
Updated on

Baramati Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 11 जागांसाठी आज मंगळवारी मतदान होणार आहे. यामध्ये बारामती लोकसभेच्या जागेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत.

सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 23,036 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले आहे आणि ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. 7 मे रोजी मतदान होत असलेल्या मतदारसंघांमध्ये बारामती, रायगड, उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

Lok Sabha Election 2024 Phase 3
Lok Sabha Election 2024 Phase 3Sakal

यातच बारामतीत मोठा घोळ झाला आहे. बारामती मतदारसंघात बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे आणि बारामती जिल्हा बँकेचं बनावट पासबुक वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप आहे. शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने या सूचना दिल्या आहेत. बँकांचे फोटो पासबुक मतदार ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सक्त सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

Baramati Lok Sabha Election 2024 election commission Instructions not to accept bank passbook as identity card
Video: दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार; पाहा, व्हिडिओ अन् फोटो

शरद पवार गटाने Xवर पोस्ट करत सांगितले की, ''निवडणूक प्रणालीच्या नियमांना छेद देत बारामती लोकसभा मतदारसंघात बनावट मतदार पुढे करण्याचं काम विरोधकांकडून सुरु आहे.

त्यासाठी बारामती को-ऑप. बँक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याद्वारे तोतया मतदारांना मतदानाकरीता बनावट पासबुक वितरीत करण्यात येत असल्याची तक्रार 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.

या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सहकारी बँकांचे फोटो पासबुक मतदार ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सक्त सूचना सर्व निवडणूक अधिकारी आणि यंत्रणांना दिल्या आहेत.''

Baramati Lok Sabha Election 2024 election commission Instructions not to accept bank passbook as identity card
Satara Lok Sabha : साताऱ्यात महाविकास आघाडीचा उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून येईल; माजी मुख्यमंत्र्यांना विश्वास

बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार घराण्याचा बालेकिल्ला आहे. तीन दशकांपासून या घराण्याचं इथे वर्चस्व आहे. शरद पवार यांचा जन्म बारामतीतच झाला. 1984 मध्ये शरद पवार पहिल्यांदा येथून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्षाकडून निवडणूक लढवली होती. यापूर्वी ही जागा काँग्रेसकडे होती.

या जागेवर सुप्रिया सुळे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांचे नातू रोहित पवार यांच्याकडे देऊन त्यांना निवडणूक प्रभारी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.