Baramulla Constituency Lok Sabha Election Result : उमर अब्दुल्लांचं काय होणार? बारामुल्लामध्ये त्रिकोणी लढत

Baramulla Constituency Lok Sabha Election Result omar Abdullah sajjad lone : लोकसभा निवडणूक २०२४ ही कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील ही पहिलीच मोठी निवडणूक होती.
Baramulla Constituency Lok Sabha Election Result omar Abdullah sajjad lone
Baramulla Constituency Lok Sabha Election Result omar Abdullah sajjad lone
Updated on

Baramulla Constituency Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणूक २०२४ ही कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील ही पहिलीच मोठी निवडणूक होती. बारामुल्ला लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान पार पडलं. या निवडणुकीत उमर अब्दुल्ला निवडणुकीच्या रिंगणात होते.

२०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले होते. यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्या सोबत २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ज्यापैकी १४ उमेदवार अपक्ष असून त्यात दोन महिलांचा देखील समावेश होता.

उमर अब्दुल्ला यांचे मुख्य प्रतिस्पर्धी फुटीरतावादी ते राजकारणी असा प्रवास राहिलेले सज्जाद लोन होते, जे यापूर्वी मंत्रीही राहिले आहेत. सज्जात लोन पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख असून बारामुल्ला मतदारसंघाच्या लढाईत दोन्ही नेत्यांच्या प्रचारसभांना लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली होती. बारामुल्ला, श्रीनगर आणि अनंतनाग-राजौरी या तीनही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांपासून भाजपने स्वतःला दूर ठेवले होते. असे असून देखील स्थानिक नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

Baramulla Constituency Lok Sabha Election Result omar Abdullah sajjad lone
Lok Sabha Election :भारतातून मेटाला सर्वाधिक बिझनेस कोणाकडून? फेसबुक आणि इंस्टाग्रामवर राजकीय पक्षांची कोटींची उड्डाणे..!

अवामी इत्तेहाद पक्षाचे नेते आणि माजी आमदार अब्दुल रशीद शेख ऊर्फ इंजिनीअर रशीद हे तुरुंगातून निवडणूक लढवत होत त्यामुळं बारामुल्ला मतदारसंघातील लढत रंजक बनली होती. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) कडून राज्यसभेचे माजी सदस्य मीर मोहम्मद फैयाज निवडणुकीत उतरले आहेत, तर तुरुंगात असलेले फुटीरतावादी नेते नईम अहमद खान यांचे बंधू मुनीर खान अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याने

या मतदारसंधात ओमर अब्दुल्ला, सज्जाद लोन आणि इंजिनिअर रशीद यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीने रशीद यांना पाठिंबा दिला होता, तर अल्ताफ बुखारी यांच्या पक्षाने सज्जाद लोन यांना पाठिंबा जाहीर केला.

Baramulla Constituency Lok Sabha Election Result omar Abdullah sajjad lone
Dhule Lok Sabha: मतमोजणीची प्रक्रिया 17 फेऱ्यांत होणार पूर्ण! प्रशासन सज्ज; विधानसभा क्षेत्रनिहाय 20 टेबलांवर होणार मतमोजणी

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत मतदान

२०१९ मध्ये बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात ३४.१७ टक्के मतदान झाले होते, कुपवाडा जिल्ह्यात सर्वाधिक ५१.७ टक्के मतदान झाले होते. त्याखालोखाल बांदीपोरा (३१.८ टक्के) आणि बारामुल्ला (२४ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

कुपवाडा, बारामुल्ला आणि बांदीपोरा या तीन जिल्ह्यांतील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये हा मतदारसंघ पसरलेला असून त्यात बडगामच्या दोन तालुक्यांचाही समावेश आहे, ज्याचा समावेश दोन वर्षांपूर्वी परिसीमन आयोगाच्या शिफारशींमध्ये करण्यात आला होता.

२०२४ लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाबद्दल बोलायचे झाल्यास उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात गेल्या ४० वर्षांत दुसऱ्यांदा सर्वाधिक मतदान झाले होते. येथे यंदा रेकॉर्डब्रेक ५९ टक्के मतदान झाले, सोपोर येथे सर्वाधिक ४४.३६ टक्के मतदान झाले. बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात एकूम १७,३७,८६५ मतदार आहेत. तर मतदारसंघात २१०३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.