Lok Sabha Voting: वोट केलं तर कापतात बोट! 'या' पोलिंग बूथवर झालं नाही एकही मतदान

Lok Sabha Voting: छत्तीसगडमधील बस्तर लोकसभा जागेसाठी आज सकाळी ७ वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी ५ वाजता संपले.
Lok Sabha Voting
Lok Sabha Votingesakal
Updated on

Lok Sabha Voting: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान झाले. मात्र छत्तीसगडच्या बस्तर लोकसभा मतदारसंघातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर दुपारी ३ वाजेपर्यंत एकही मतदान झाले नाही.  कडेकोट बंदोबस्तात ठेऊन देखील कोणीही मतदान केलं नाही. निवडणूक आयोगाने मतदानासंदर्भात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ५८.१८ टक्के मतदान झाले आहे.

छत्तीसगडच्या बस्तर लोकसभा मतदारसंघातील सुकमा जिल्ह्यात हिडमाचे पूर्वर्ती गाव संपूर्ण क्षेत्राचे भयंकर आणि प्रसिद्ध नक्षलवादी, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात संवेदनशील मानले जाते. यामुळे प्रशासनाने येथील बूथ अन्य भागात हलवले. पूर्वर्ती येथील बूथ सिलगेर येथे हलवण्यात आले. इंथ कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. तरी देखील पूवर्ती गावातील एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही.

सुकमा जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या पूर्वर्ती गावातील लोकांनी ३ दशकांपासून मतदानात भाग घेतला नसल्याचे सांगितले जाते. त्यामागे नक्षलवाद्यांची दहशत हेच कारण आहे. इथे नक्षलवाद्यांनी मतदान करणाऱ्यांची बोटे कापल्याची देखी चर्चा आहे. हिंन्दुस्थान लाईव्हने याबाबत वृत्त दिले आहे. 

आजही नक्षलवाद्यांबाबत येथील लोकांच्या मनात हीच भीती निर्माण झाली आहे. मतदानानंतर बोटांना शाई लावू नये, अशा सूचना येथील नागरिकांना देण्यात आल्या होत्या. तरी देखील गावातील एकाही मतदाराने मतदान केलेले नाही. काही महिन्यांपूर्वीच सुरक्षा दलांनी लोकांपर्यंत पोहोचून नक्षलवादी नेता हिडमाच्या गावात वैद्यकीय शिबिर उभारले होते.

Lok Sabha Voting
Sunetra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांनी साधला मनसे पदाधिका-यांशी संवाद

बस्तर मतदारसंघात मतदान करण्यासाठी १९६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या मतदान केंद्रांवर संवेदनशील ठिकाणी सकाळी ७ ते दुपारी ३ आणि सर्वसाधारण ठिकाणी सकाळी ७ ते सायंकाळी ५ अशी मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ५८.१४ टक्के मतदान झाले. ज्यामध्ये जगदलपूर विधानसभा, चित्रकोट विधानसभा, बिजापूर विधानसभा, दंतेवाडा विधानसभा, कोंडागाव विधानसभा, नारायणपूर विधानसभा आणि सुकमा विधानसभेच्या ७२ मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपली आहे.

Lok Sabha Voting
Narendra Modi : ''लोकांनी शहजादेंना आधीच नाकारले'', अमरोहातील सभेतून पंतप्रधानांचा घणाघात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.