मुख्यमंत्री शिंदे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावात येणार; कन्नड संघटनांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या

महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार असताना मुख्यमंत्री शिंदे भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमाभागातील ८६५ गावांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय गतवर्षी घेतला होता. त्याला कन्नड संघटनांनी विरोध केला होता.

बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असल्याने येथील कन्नड संघटनांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. या विषयावरून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. येथील कन्नड संघटनांच्या कृती समितीने शिंदे यांच्या बेळगाव व खानापूर दौऱ्याचे स्वागत केले आहे.

CM Eknath Shinde
Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

भविष्यात शिंदे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांपासून दूर रहावे, असा अनाहूत सल्लाही त्यांनी दिला आहे. सीमाभागातील वस्तुस्थिती जाणून घेऊनच शिंदे हे भाजपच्या (BJP) प्रचारासाठी येत असल्याची व त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांचा मुखभंग झाल्याची टिप्पणीही केली आहे.

बेळगाव व कारवार लोकसभा (Belgaum and Karwar Lok Sabha) मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार असताना मुख्यमंत्री शिंदे भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे सीमाभागात समितीच्या अस्तित्वाबाबतची वस्तुस्थिती शिंदे यांना कळली आहे. त्यामुळेच ते भाजपच्या प्रचारासाठी येत आहेत, असे कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राच्या पाठिंब्यावर सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अस्तित्व टिकून आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी येत आहेत.

CM Eknath Shinde
Sangli Lok Sabha : महायुती भक्कम, 'मविआ'मध्ये फूट; दोन्ही आघाड्यांतील नेत्यांचा आदेश कार्यकर्ते मनापासून पाळणार का?

येथील समितीच्या एका गटाने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी १९८६ ला कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांना त्यावेळी कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. बळ्ळारी येथील कारागृहात पाठविले होते. मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांनी सीमाप्रश्‍नाबाबत अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. असे असताना ते भाजपच्या प्रचारासाठी बेळगावला येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीकडूनही त्यांना विरोध होत आहे. गतवर्षी विधानसभा निवडणुकीतही शिंदे यांनी कर्नाटकातील काही मतदारसंघांत भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. पण, त्यावेळी ते बेळगावात आले नव्हते.

CM Eknath Shinde
Madha Lok Sabha : उदयनराजेंसाठी मनसेचं इंजिन सुसाट, पण माढ्याबाबतची भूमिका अद्याप गुलदस्त्यात!

कन्नड संघटनांनी केला होता विरोध

मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमाभागातील ८६५ गावांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय गतवर्षी घेतला होता. याशिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही त्यानी सीमाभागातील काही गरजूंना आर्थिक मदत देऊ केली आहे. त्याला येथील कन्नड संघटनांनी विरोध केला होता. महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी बेळगावात सेवाकेंद्रांची स्थापना केल्यावर तर त्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्याआधारे केंद्रांना टाळे ठोकले होते. जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी केल्याबद्दल शहरातील दोन हॉस्पिटल्सना नोटीस बजावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.