प्रेमजीभाई रणछोडदास असर यांना त्याकाळी ‘प्रेमस्वरुप प्रेमजीभाई’ म्हणून ओळखले जात असे. एक सज्जन आणि समाजासाठी सातत्याने काम करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती.
Bharatiya Jana Sangh : मुंबई राज्याच्या रत्नागिरी लोकसभा (Ratnagiri Lok Sabha) मतदारसंघातून १९५७ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत जनसंघाचा विजय झाला होता, हे अनेकांना माहितीही नसेल; पण हे खरे आहे. प्रेमजीभाई रणछोडदास असर (Premjibhai Ranchhoddas Asar) हे भारतीय जनसंघ पक्षाचे उमेदवार म्हणून १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मुंबई राज्यातील रत्नागिरी उत्तर लोकसभा मतदारसंघातून जनसंघाच्या ‘पणती’ या निशाणीवर लोकसभेवर निवडून गेले.
भारतीय जनसंघ (Bharatiya Jana Sangh) आणि रा. स्व. संघाचे नाते खूप जुने आहे व अतुट आहे. जनसंघासाठी रा. स्व. संघ जन्मदात्यासारखा आहे. संघ भारतीय जनसंघ जन्मदाती संघटना आहे. जनसंघाच्या काळात पक्षाला ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. जनसंघाच्या नेत्यांना दगड मारले गेले, असा तो कठीण काळ होता. जनसंघाने त्याकाळात मोठी आंदोलने केली, संघर्ष केला. त्याचा फायदा असर यांना झाला होता.
प्रेमजीभाई रणछोडदास असर यांना त्याकाळी ‘प्रेमस्वरुप प्रेमजीभाई’ म्हणून ओळखले जात असे. एक सज्जन आणि समाजासाठी सातत्याने काम करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. स्वातंत्र्य चळवळीत माधवराव मुळे यांच्यामुळे राजकारणात आलेल्या असर यांनी त्याकाळी भारतीय जनसंघाची पाळेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात रुजवली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्वतः भाग घेऊन त्यांनी हा प्रश्न लोकसभेत पोटतिडकेने लावून धरला.
त्याकाळी त्यांनी कोकण रेल्वेचा प्रश्नही लोकसभेत मांडला होता. खासदारांना आपल्या भाषेत प्रश्न आणि भाषण करायला दिले पाहिजे, या त्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले. काँगेसचे नेते आणि कट्टर विरोधक राजाभाऊ रेडीज यांच्यावर बँकेची जप्ती आल्यावर त्यांच्यासाठी धावून जाणारे प्रेमजीभाई असर अनेकांना माहीत नसतील; पण त्याकाळी अखंड रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्यांनी केलेले कार्य जुन्या लोकांना ज्ञात आहे, एवढे मात्र निश्चित.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.