Satara Loksabha : भाजपच्या दोन यादीत नाव नाही, उदयनराजे राजकारणातून संन्यास घेणार? राजे म्हणाले, बाकीच्या तिकिटाच मला..

सातारा लोकसभेच्या निवडणुकीत (Satara Loksabha Election) तिकीट वाटपाचा घोळ सुरू आहे.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

भाजपच्या पहिल्या दोन यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक आहेत.

सातारा : सातारा लोकसभेच्या निवडणुकीत (Satara Loksabha Election) तिकीट वाटपाचा घोळ सुरू आहे. अनेक जण नाराज आहेत; पण या सर्व पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मात्र, अगदी मिश्किलपणे उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘‘माझ्याकडे तिकिटे आहेत ना, प्लेनचे, ट्रेनचे, पिक्चरचे आणि बसचेही तिकीट आहे. बाकीच्या तिकिटाच मला माहिती नाही. ज्यावेळी ठरवतील त्यावेळी बघू, असे सांगतानाच ‘मी काही संन्यास घेणार नाही,’ असे सांगत त्यांनी सातारा लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे अप्रत्यक्ष नमूद केले.

सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पहिल्या दोन यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक आहेत. त्यांनी उदयनराजेंनाच तिकीट मिळावे, अशी मागणी लावून धरली असून, प्रसंगी भाजपच्या (BJP) सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे.

MP Udayanraje Bhosale
Satara Loksabha : साताऱ्यातून उदयनराजेंचा पत्ता कट? रामराजेंच्या उमेदवारीच्या चर्चेने खळबळ, 'ती' पोस्ट व्हायरल

या सर्व पार्श्वभूमीवर काल सातारा शहरातील हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाचे लोकार्पण खासदार उदयनराजेंच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. सातारा लोकसभेच्या जागा वाटपाचा घोळ सुरू आहे. अनेक जण तिकीट मिळेल की नाही, यावरून नाराज आहेत.

MP Udayanraje Bhosale
Kolhapur Loksabha : 'जुना राग काढण्याचा पवारांचा डाव, म्हणूनच शाहू महाराजांना उमेदवारी दिली'; मंडलिकांचा आरोप

यावेळेस तुम्हाला तिकीट मिळेल असे वाटते का? या प्रश्नावर खासदार उदयनराजे म्हणाले, ‘‘माझ्याकडे प्लेनचे, ट्रेनचे, पिक्चरचे आणि बसचे तिकीट आहे. बाकीच्या तिकिटाचे मला माहिती नाही. ज्यावेळी ठरवतील, त्या वेळी बघू.’’ भाजपकडून तिकीट मिळेल की नाही, यावर उदयनराजे म्हणाले, ‘‘यावर आताच बोलणे उचित ठरणार नाही. कारण महायुतीत तीन पक्ष एकत्र आहोत. सर्वांना वाटते, की आपल्यालाच तिकीट मिळावे. यामध्ये अजितदादा असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील. प्रत्येकाची इच्छा असते. यामध्ये वेगळे काहीही नाही.’’ पुढे काय निर्णय असेल, यावर उदयनराजे म्हणाले, ‘‘मी काय संन्यास घेणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.