Congress Seat Sharing : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. सोबत सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीचं वेळापत्रकही जाहीर केलं आहे. बिहारमध्ये काँग्रेसने ११ जागांवर लोकसभा लढवण्याचा निश्चय केला आहे. या मतदारंसंघांमध्ये बेगूसराय आमि कटिहार यासारख्या विभागांचाही समावेश आहे.
बेगूसराय आणि कटिहार या दोन्ही जागांवरुन राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येतंय. काँग्रेस या दोन जागांसाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे. महाआघाडीत सुरु असलेला या वादामध्ये काँग्रेसचे दोन चेहरे समोर येत आहेत. एक आहे कन्हैया कुमार आणि दुसरा आहे तारीक अन्वर.
बेगूसराय लोकसभेच्या जागेवर जेएनयू विद्यार्थी परिषदेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांना उभं करण्याचा काँग्रेसचा विचार आहे. त्यांनी २०१९ मध्ये सीपीआयच्या तिकिटावर याच मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना गिरीराज सिंह यांच्या सामना करावा लागला होता.
तिकडे कटिहार लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. काँग्रेस माजी केंद्रीय मंत्री आणि आयसीसीचे सदस्य तारीक अन्वर यांना उभं करण्याच्या तयारीत आहे. तर राष्ट्रीय जनता दलाकडून माजी राज्यसभा सदस्य अहमद अशफाक करीम यांना तिकिट देण्याची मागणी करण्यात येत आहे.
शनिवारी पाटणा येथील काँग्रेस मुख्यालयात एक बैठक संपन्न झाली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष वाल्मिकी नगर, मोतिहारी, नवादा, मधुबनी, पूर्णिया, सुपौल, किशनगंज, औरंगाबाद, सासाराम आणि पाटलीपुत्र येथील संभाव्य उमेदवारांच्या नावांवरही विचार करत आहे.
या बैठकीमध्ये लोकसभेच्या जागांवर चर्चा झाली. काँग्रेसला किमान 11 जागा मिळतील अशी आशा आहे. पक्षाने वाल्मिकी नगर किंवा मधुबनी यापैकी एक जागा आरजेडीकडे मागितली आहे. आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला येत्या आठवडाभरात ठरण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.