मुंबई : भाजपचे मुंबई उत्तर पूर्वचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयावर शुक्रवारी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला. कोटेच्या यांच्या वॉररुमची तोडफोड केली. कोटेच्या यांच्याकडून लोकांना पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, हल्ल्याची माहिती कळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. (BJP candidate Mihir Kotecha office attacked and vandalised by Thackeray group alleging distribution of money)
यावेळी संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की, इथं कोटेच्या यांच्या कार्यालयात पैशांचं देणंघेणं सुरु होतं. त्यानंतर इथं असलेले निवडणूक आयोगाचे अधिकारी कोटेच्या यांच्या कार्यालयात गेले. त्यानंतर इथं मुलुंडचे पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी इथं २ लाखांची कॅश पकडली. पण आमचा असा संशय आहे की इथं मोठ्या प्रमाणावर कॅश आहे, तसेच याचा काय तो बंदोबस्त झाला पाहिजे.
दरम्यान, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं की, छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला करायला शिकवत नाही. संजय दिना पाटील यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. त्यामुळं असा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला तो सहन केला जाणार नाही. खोट्या तक्रारी करुन महिलांवर हल्लाही करण्यात आला. याचा आम्ही निषेध करतो. ज्या प्रकारे गुंड प्रवृत्तीचे उमेदवार दिले आहेत त्यांच्याकडून अपेक्षाच ही आहे. पण आम्ही संस्कृतीनं चालणारे लोक आहोत. लोकशाही मार्गानं आम्ही याचा संघर्ष करु आणि न्याय मागू.
पैशांच्या वाटपावर बोलताना लाड म्हणाले, हे बोगस आरोप आहेत. कारण निवडणूक आयोगाचे लोकही इथं कार्यालयात गेले तिथं काहीही अजूनपर्यंत मिळालेलं नाही. मला वाटतं त्यांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे, त्यामुळं ते खोटे आरोप करत आहेत. संजय राऊत आणि सुनील राऊत जसे आरोप करतात तसाच हा प्रकार आहे. याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.