Loksabha Election 2024 : शिवसेनेला १४ जागा देण्याची भाजपची तयारी

युतीधर्माला जागत शिवसेनेला (शिंदे गट) १४ खासदार देण्याची तयारी भाजपने दाखविली आहे; मात्र उमेदवार निश्चित करताना विश्वासात घेण्याची अटही टाकली आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal
Updated on

मुंबई : युतीधर्माला जागत शिवसेनेला (शिंदे गट) १४ खासदार देण्याची तयारी भाजपने दाखविली आहे; मात्र उमेदवार निश्चित करताना विश्वासात घेण्याची अटही टाकली आहे. गेले दोन -तीन दिवस सतत चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर आता शिवसेनेला त्यांच्याकडे असलेल्या १३ खासदारांसह आणखी एक अशा १४ जागा देण्याची तयारी भाजपने दाखविली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सहा जागा देण्यास भाजप तयार आहे. मात्र या दोन्ही पक्षांनी उमेदवार निवडीबाबत विश्वासात घ्यावे अशी अपेक्षाही पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेनेबरोबरील कित्येक वर्षांच्या युतीमुळे शिंदे गटाशी भाजपचे जुने संबंध आहेत. त्यांनी उमेदवार घोषित करताना आमच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणत त्यांच्या सहकाऱ्यांनी जागा मागून घेतल्याची भाजपची भावना आहे.

हिंगोलीत हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या भाजपच्या मंडळींना उमेदवार कोणता द्यायचा हे ठरविणे हा त्या पक्षाचा अधिकार आहे, असे फडणवीस यांनी समजावून सांगितले. युतीधर्माचे पालन करत शिवसेनेला निवडून देण्यासाठी कामाला लागा, अशी सूचनाही केली आहे. सुमारे चार चार तासांच्या चर्चेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, रायगड, शिरूर आणि परभणी अशा चार तसेच अद्याप जाहीर न झालेल्या उस्मानाबाद, नाशिक या विचाराधीन असलेल्या दोन किंवा लक्षद्वीप अशा सहा जागा लढवेल.

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 : निवडणूक संपेपर्यंत कारवाई होणार नाही ; थकबाकीप्रकरणी प्राप्तिकरचा काँग्रेसला दिलासा

उमेदवार बदलण्याचे धोरण

शिवसेनेने रामटेक, कोल्हापूर, हातकणंगले, शिर्डी, बुलडाणा, मावळ, दक्षिण मध्य मुंबई, हिंगोली अशा आठ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातील काही बदलले जाण्याची शक्यता आहे. या बरोबरच कल्याण, यवतमाळ, पालघर, मुंबईतील दोन आणि नाशिक व ठाण्यापैकी एक जागा लढवेल, अशी आखणी झाली आहे. रामटेक येथे ज्याप्रमाणे उमेदवार बदलण्यास मान्यता दिली तसेच धोरण ठेवावे, अशी अट घातली आहे. जागा जिंकण्यासाठी हे आवश्यक असल्याचेही समजावून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.