हैदराबाद : लोकसभेच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह भाजप नेते वारंवार मुस्लिम समाजा संदर्भात भाष्य करत आहेत. त्यांच्या या विधानांना एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. द्विराष्ट्र सिद्धांतावर भाष्य करताना त्यांनी म्हटलं की, आम्ही इथंच जन्मलो, इथंच मरणार आता या देशातून पुन्हा स्थलांतर होणार नाही. (Born here will die here no migration from the country again Asaduddin Owaisi attack on Narendra Modi Amit Shah)
तेलंगाणात एका प्रचार सभेत बोलताना ओवैसी म्हणाले, टू नेशन थेअरी हे पुस्तक कोणी लिहिलं?, हिंदू-मुस्लिम हे दोन भिन्न देश आहेत, असं कोण म्हटलं होतं? आम्ही म्हटलं होतं का हे, तर नाही. पण माझ्या मित्रांनो मला तुम्हाला याची आठवण करुन द्यायची आहे की, भारताचे प्रधानमंत्री आणि भाजपवाले म्हणतात की एमआयएमला मत देणं म्हणजे पाकिस्तानला मतं देण्यासारखं आहे.
हे बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही का? कारण टू नेशन थिअरी अर्थात द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत तुम्हीच मांडला, तुमच्याच हिरोनी मांडला. आम्ही आज भारतात आहोत आणि राहू. तुम्ही माझं म्हणणं ऐका आम्ही याच भूमीत जन्मलो आणि याच भूमीत मरणार आहोत. ऐका भाजप, आरएसएस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह की आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होणार नाही.
आम्ही याच देशात राहणार आहोत. या कठीण प्रसंगात आम्ही हिंमतीनं एकजुटीनं तुमचा मुकाबला करु. तुमच्या अन्यायाला उत्तर आम्ही संसदेत आमचे प्रतिनिधी पाठवून तिथं आवाज उठवून करणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.