Eknath Shinde : म. ए. समितीचा विरोध मुख्यमंत्री शिंदेंच्या जिव्हारी? 'या' लोकसभा मतदारसंघातील प्रचारसभा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते.
Eknath Shinde Belgaum and Chikodi Lok Sabha
Eknath Shinde Belgaum and Chikodi Lok Sabhaesakal
Updated on
Summary

सीमालढ्यात कारावास भोगलेल्या शिंदे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करू नये, अशी सर्वसामान्य मराठी भाषिकांची अपेक्षा होती.

बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघातील प्रचारसभा अखेर रद्द झाल्या. शनिवारी चिकोडी मतदारसंघातील निपाणी व बेळगाव (Nipani Belgaum) मतदारसंघातील पंत बाळेकुंद्री या ठिकाणी शिंदे यांची प्रचारसभा आयोजित होती. पण शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. यामुळे निपाणी येथील सभा रद्द करण्यात आली पण पंतबाळेकुंद्री येथे शिंदे यांच्या अनुपस्थितीत सभा घेण्यात आली.

त्या सभेला भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यामुळे शिंदे यांचा बेळगाव व चिकोडी दौरा रद्द झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. पण सीमाभागातील मराठी भाषिक व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) विरोधामुळे शिंदे यांनी प्रचारसभा न घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Eknath Shinde Belgaum and Chikodi Lok Sabha
Satara Lok Sabha : '..तसं नाही केलं तर पवारांची औलाद सांगणार नाही'; कोणाला उद्देशून म्हणाले अजितदादा?

गुरूवारी (ता. २) शिंदे यांनी खानापूर येथे प्रचारसभा घेतली. कारवार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विश्‍वेश्‍वर हेगडे-कागेरी यांचा प्रचार त्यांनी केला. पण कारवार मतदारसंघात यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार असल्याने शिंदे यांच्या प्रचारसभेमुळे मराठी भाषिक व समिती कार्यकर्ते नाराज झाले. गुरूवारीच शिंदे यांनी धारवाड येथे भाजप उमेदवार प्रल्हाद जोशी यांच्यासाठीही प्रचार सभा घेतली, पण त्या सभेला कोणीही आक्षेप घेतला नाही. भाजप उमेदवारासाठी प्रचारसभा घेतल्याने सीमाभागात निर्माण झालेली नाराजी शिंदे यांना कळली. त्यामुळे ते शनिवारी निपाणी व पंत बाळेकुंद्री येथे सभा घेणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात होती. ती शक्यता खरी ठरली आहे.

Eknath Shinde Belgaum and Chikodi Lok Sabha
तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

वस्तुतः दोन मे रोजी निपाणी, खानापूर व पंत बाळेकुंद्री या तीन ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांची प्रचारसभा होणार होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर सीमाभागातून मोठा विरोध झाला होता. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने ट्वीट करून त्यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यामुळे शिंदे यांची निपाणी व पंत बाळेकुंद्री येथील २ मे रोजीची सभा रद्द केली. त्या दिवशी खानापूर व धारवाड येथे सभा झाली. चार मे रोजी निपाणी व पंत बाळेकुंद्री येथे सभा घेण्याचे निश्‍चित झाले. चिकोडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आण्णासाहेब जोल्ले व बेळगावचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांचा प्रचार शिंदे करणार होते. दोन्ही ठिकाणी सभेची तयारी केली होती. पण शिंदे शनिवारी बेळगाव जिल्‍ह्यात आलेच नाहीत.

Eknath Shinde Belgaum and Chikodi Lok Sabha
Kolhapur Airport : विमानांसह हेलिकॉप्टरची 195 'राजकीय उड्डाणे'; लोकसभा निवडणुकीमुळे कोल्हापूर विमानतळ गजबजले

शिंदेंचा अखेरच्या टप्प्यात प्रयत्न

सीमालढ्यात कारावास भोगलेल्या शिंदे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करू नये, अशी सर्वसामान्य मराठी भाषिकांची अपेक्षा होती, ती अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी अखेरच्या टप्प्यात केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.