पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मतदानासाठी पैसे वाटले जात असल्याचं खळबळजनक आरोप केला होता. फक्त आरोपच नव्हे तर त्यांनी पैसे वाटतानाचा व्हिडिओच ट्विट केला होता. यामध्ये पुणे जिल्हा सहकारी बँक अर्थात PDCC बँकेतून पैसे वाटप झाल्याचा गंभीर आरोप केला होता.
त्यानंतर याप्रकरणी निवडणूक आयोगाकडं त्यांनी तक्रारही केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगानं आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बँकेवर गुन्हा दाखल केला आहे. (Case has been filed against PDCC Bank along with its manager after video shared by Rohit Pawar)
नेमकं काय घडलं?
तिसऱ्या टप्प्यात आज बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. या लोकसभा मतदारसंघात भोर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघांतर्गत वेल्हे तालुक्याचाही समावेश होते. (Latest Marathi News)
याच वेल्हेतील पीडीसीसी बँकेची शाखा काल रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवण्यात आली होती. उशीरा बँक याचसाठी ठेवण्यात आली होती कारण मतदारांना पैशांचं वाटप करता यावं. याचा व्हिडिओ देखील रोहित पवार यांनी ट्विट केला होता. यामध्ये चार-पाच लोक बँकेत फिरत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, रोहित पवारांच्या या ट्विटनंतर बारामतीसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. अजित पवारांनीही यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांना सोशल मीडिया हँडल करण्याचा चांगला अनुभव असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळंच त्यांनी काहीतरी खोटाटोप करुन जुना व्हिडिओ कालचा असल्याचं दाखवलं असेल असं सांगताना हे खरंच झालं असेल तर त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही केली होती. (Marathi Tajya Batmya)
आयोगानं काय केली कारवाई?
रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्यानं आचारसंहितेचा भंग झाल्याचं सांगत निवडणूक विभागाच्या भरारी पथकानं पीडीसीसी बँकेवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. रात्री PDCC बँकेत 40 ते 50 लोक संशयतरीत्या फिरत असल्याचं CCTV फुटेजमध्ये भरारी पथकाच्या तपासात स्पष्ट झालं आहे. त्यामुळं याप्रकरणी बँक मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.