Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

निवडणूक आयोगानं स्वतः शनिवारी ही माहिती तपशीलवार माहिती जाहीर केली.
Trucks Carrying Cash
Trucks Carrying CashEsakal
Updated on

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आत्तापर्यंत 8,889 कोटी रुपयांची रोकड, 4 हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज आणि इतर मोठ्या प्रमाणावर प्रलोभनं म्हणून देण्यात आलेल्या वस्तू निवडणूक आयोगानं जप्त केल्या आहेत. शनिवारी निवडणूक आयोगानं स्वतः ही माहिती तपशीलवार माहिती जाहीर केली. (Cash of value 8889 crore rs 4000 crore rupees drugs seized during Lok sabha Election 2024 by ECI)

Trucks Carrying Cash
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी; ट्रक पलटल्यानं वाहतूक ठप्प

निवडणूक आयोगानं म्हटलं की, ड्रग्ज, दारु, सोनं, मोफत वाटप करण्यात आलेल्या वस्तू आणि विविध ठिकाणी छापेमारीत मिळालेल्या रोख रकमा निवडणुकांवर परिणाम करत असतात. यामध्ये काही वस्तू या थेट प्रलोभनं म्हणून देण्यात येतात तर काही इतर स्वरुपात दिली जातात.

Trucks Carrying Cash
Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

या निवडणुकीत आयोगानं यंदा नशेचे पदार्थ, ड्रग्ज यांच्या जप्तीवर विशेष भर दिला होता. छापेमारीनंतर आकडेवारीचं विश्लेषण केल्यानंतर हे लक्षात आलं की, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाला जोडणारा जो मार्ग आहे ते वेगानं ड्रग्ज सेवनाचे क्षेत्र बनत चालले आहेत.

Trucks Carrying Cash
CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

दरम्यान, गुजरात दहशतवादविरोधी पथक, नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो आणि भारतीय तटरक्षक दलानं संयुक्त मोहिमेद्वारे तीन दिवसांत ८९२ कोटी रुपये किंमतीची तीन नशेची औषधं जप्त केली आहेत. आयोगानं सांगितलं की, ८४९.१५ कोटी रुपये रोख, ८१४.८५ कोटींची दारु, ३,९५८.८५ कोटी रुपयांचं ड्रग्ज आणि १२६०.३३ कोटी रुपये किंमतीचे सोनं नाणं जप्त केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.