Chikkodi Lok Sabha : मोदी दहा वर्षांपासून देशाची फसवणूक करताहेत, 15 लाखाचं काय झालं? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल

काँग्रेसच्या प्रियंका सतीश जारकीहोळी यांना साथ द्या. संसदेत तरूण आवाजाला संधी द्या.
Chikkodi Lok Sabha Karnataka CM Siddaramaiah
Chikkodi Lok Sabha Karnataka CM Siddaramaiahesakal
Updated on
Summary

''आमचे पैसे आम्हाला देण्यास विरोध करून सुड भावनेचे काम करत असलेल्या मोदी सरकारला धडा शिकवा.''

चिक्कोडी : दहा वर्षांपूर्वी विविध आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातील प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. रोज एक नवे खोटे बोलून केवळ सत्तेसाठी मोदी (Narendra Modi) हे काम करत आहेत. भाजपविरोधातील सरकार असलेल्या राज्यांना द्वेषाची भावना ठेवून काम करत आहे. कर्नाटकवर मोदी यांचा विशेष राग असल्यासारखे वागत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी केला.

Chikkodi Lok Sabha Karnataka CM Siddaramaiah
Satara Lok Sabha : 'मोदींच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जातंय'; शरद पवारांची पंतप्रधानांवर सडकून टीका

येथील आर. डी. हायस्कूलच्या मैदानावर शनिवारी संध्याकाळी आयोजित चिक्कोडी लोकसभा (Chikkodi Lok Sabha) मतदारसंघाच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी (Priyanka Jarkiholi) यांच्यासाठी प्रचारसभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी हे दहा वर्षांपासून देशाची फसवणूक करत आहेत. १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देणे, वर्षाला दोन कोटी रोजगार देणे, महागाई कमी करणे, काळा पैसा आणण्याचे आश्वासन दिले होते. इंधनाचे दरही भडकले आहेत.'

सिद्धरामय्या पुढे म्हणाले, कर्नाटकात आम्ही सत्तेवर आल्यावर पंचहमी योजनेद्वारे शंभर दिवसांत सर्व आश्वासने पूर्ण केली. आता केंद्रातील काँग्रेस नेत्यांनीही २५ गॅरंटी दिली आहे. गरिबांच्या कल्याणासाठी काँग्रेसला मतदान करणे आवश्यक आहे. कर्नाटकात यापूर्वी भाजप सरकारने काहीही केले नाही. आमच्या सरकारवर लोकांचा विश्वास आहे. म्हणून आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. राज्यात बसवण्णा यांना सांस्कृतिक नेता जाहीर केले आहे.

Chikkodi Lok Sabha Karnataka CM Siddaramaiah
Sangli Lok Sabha : 'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठीशी, त्यांची भूमिका संशयास्पद'; ओबीसी नेते शेंडगेंची टीका

कर्नाटक हे देशात सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या दुसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे. त्यामुळे आमचे पैसे आम्हाला देण्यास विरोध करून सुड भावनेचे काम करत असलेल्या मोदी सरकारला धडा शिकवा. राज्यातील २५ पैकी एकाही खासदाराने याबाबत आवाज उठविला नसल्याने एकाही भाजपच्या खासदारास मते देऊ नका. काँग्रेसच्या प्रियंका सतीश जारकीहोळी यांना साथ द्या. संसदेत तरूण आवाजाला संधी द्या.

उमेदवार प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या, राज्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढवत आहे. या भागासाठी बरेच काही करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तरूणांचा व सर्वांचा आवाज बनायचा आहे. काँग्रेसने राबविलेल्या योजनाच नावे बदलून भाजप वापरत आहे. योजनांचा चिक्कोडी मतदारसंघाला अधिक लाभ होण्यासाठी मला साथ द्या.

Chikkodi Lok Sabha Karnataka CM Siddaramaiah
छत्रपती शिवराय आदिल शहासमोर कधीच झुकले नाहीत, पण उदयनराजे अमित शहांपुढे झुकले; आप खासदाराची घणाघाती टीका

यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, प्रकाश हुक्केरी, लक्ष्मण सवदी, के. एच. मुनियप्पा, महेंद्र तम्मनावर, काकासाहेब पाटील, उत्तम पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मंत्री एम. सी. सुधाकर, मंत्री डी. सुधाकर, आमदार गणेश हुक्केरी, राजू कागे, ए. बी. पाटील, शाम घाटगे, वीरकुमार पाटील, प्रा. सुभाष जोशी, लक्ष्मण चिंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.