Eknath Shinde: मुख्यमंत्री अज्ञातस्थळी! भेटीसाठी आलेले आमदार निवासस्थानी राहिले ताटकळत

लोकसभा निवडणुकीच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. त्यात ठाणे, कल्याणसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी आज सायंकाळी अनेक आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

पण मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट होऊ शकली नाही, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अज्ञानस्थळी होते आणि त्यांनी आपल्याच लोकांची भेट घेणं टाळल्याचं बोललं जात आहे. (CM Eknath Shinde in an unknown place MLAs who came for the visit stayed at the residence)

CM Eknath Shinde
C Link: वरळी-वांद्रे सी लिंकवरील टोल सोमवारपासून वाढणार; जाणून घ्या दरवाढ किती असेल?

उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत तसेच आमदार सुहास कांदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आले होते. मात्र, तीन तास प्रतीक्षा करूनही मुख्यमंत्री आले नाहीत. त्यामुळे, त्यांनी त्यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली. (Latest Marathi News)

CM Eknath Shinde
C Link: वरळी-वांद्रे सी लिंकवरील टोल सोमवारपासून वाढणार; जाणून घ्या दरवाढ किती असेल?

दरम्यान, ही भेट राज्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात होती, असे शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्री आज दिवसभर ठाण्यात होते. मात्र निवासस्थानी आलेल्या मंत्र्यांची भेट घेणे त्यांनी टाळल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी ही भेट घेणे का टाळले असावे हे गुलदस्त्यात असले तरी मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमके काय आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()