Loksabha Election 2024 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयुक्तांची बैठक ;महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर चार महापालिकांच्या आयुक्तांची उपस्थिती

मागील लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरलेल्या ११ राज्यांमधील महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज घेतली.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal
Updated on

नवी दिल्ली : मागील लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरलेल्या ११ राज्यांमधील महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या चार महापालिकांच्या आयुक्तांचा समावेश होता.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा, गुजरात, पंजाब, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि झारखंड ही ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरी ६७.४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते त्यापार्श्वभूमीवर यंदा लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली.

या बैठकीत दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, ठाणे, नागपूर, पाटणा, लखनऊ व कानपूरचे महापालिका आयुक्त तसेच बिहार व उत्तर प्रदेशातील काही जिल्हा निवडणूक अधिकारीही उपस्थित होते.

Loksabha Election 2024
Sangli Loksabha Constituency : ‘सांगलीत मैत्रीपूर्ण लढत नाही’ ;विशाल पाटील यांच्यासाठी राज्यसभेचा प्रस्ताव

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेले महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ : धुळे (५७.०५ टक्के), जळगाव (५६.५५ टक्के), नागपूर (५४.९४ टक्के), भिवंडी ( ५३.२० टक्के), कल्याण (४३.३१ टक्के), ठाणे (४९.३९ टक्के), वायव्य मुंबई (५४.३७ टक्के), ईशान्य मुंबई (५७.२३ टक्के), उत्तर मध्य मुंबई (५३.६८ टक्के), दक्षिण मध्य मुंबई (५५.४० टक्के), दक्षिण मुंबई (५१.५९ टक्के), पुणे (४९.८९ टक्के), सोलापूर (५८.६७ टक्के)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.