Loksabha Election : कम्युनिस्टांची बंगालमध्ये अस्तित्वाची लढाई ; तीन दशके सत्ताधारी राहिलेल्या पक्षाला आता नेतृत्वच नाही

तब्बल ३४ वर्षे पश्चिम बंगालवर अधिराज्य गाजविणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) आता एक-दोन जागा जिंकणेही अवघड झाले आहे. ज्योती बसू, सोमनाथ चॅटर्जी, बुद्धदेव भट्टाचार्य, इंद्रजित गुप्ता, वासुदेव आचार्य यांसारख्यांनी नेतृत्व केलेल्या या पक्षात आता नेतृत्वाची वानवा आहे.
Loksabha Election
Loksabha Electionsakal
Updated on

कोलकता : तब्बल ३४ वर्षे पश्चिम बंगालवर अधिराज्य गाजविणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) आता एक-दोन जागा जिंकणेही अवघड झाले आहे. ज्योती बसू, सोमनाथ चॅटर्जी, बुद्धदेव भट्टाचार्य, इंद्रजित गुप्ता, वासुदेव आचार्य यांसारख्यांनी नेतृत्व केलेल्या या पक्षात आता नेतृत्वाची वानवा आहे. याची जाणीव झाल्याने आता सोशल मीडियासह तरुण नेतृत्वाला वाव देण्याचा आता प्रयत्न सुरू झाला आहे.

६०च्या दशकात सुरू झालेली नक्षलवादी चळवळ व या चळवळीला बळाचा वापर करून संपविण्याचा तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांच्या प्रयत्नामुळे पश्चिम बंगालच्या लोकांमध्ये पसरलेल्या असंतोषामुळे ‘माकप’ला संधी मिळाली आणि ज्योती बसू यांच्यासारखा नेता मिळाल्याने तब्बल ३४ वर्षे ‘माकप’ला पश्‍चिम बंगालमध्ये सत्ता मिळाली. ज्योती बसूंच्या नेतृत्वाचा अस्त झाल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांना सिंगूरचा मुद्दा योग्य तऱ्हेने हाताळता आला नाही. याच मुद्याचा फायदा उचलून राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणातून काहीशा बाहेर फेकल्या गेलेल्या ममता बॅनर्जी यांना संधी मिळाली.

यानंतर ‘माकप’ची वाताहत झाली. सध्या विधानसभेत ‘माकप’चा एकही आमदार नाही. यावेळी लोकसभेत ‘माकप’ने काँग्रेसशी आघाडी केली आहे. ‘माकप’ २४ जागांवर निवडणूक लढवीत आहे. यापैकी मुर्शिदाबाद येथील उमेदवार आणि ‘माकप’चे नेते महंमद सलीम आणि जादवपूरमध्ये श्रीजन भट्टाचार्य या दोन उमेदवारांच्या विजयाची सर्वाधिक आशा आहे. यासंदर्भात ‘माकप’चे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष महंमद सलीम सकाळशी बोलताना म्हणाले, ‘‘इंडिया आघाडीला सात ते आठ जागांवर विजय मिळण्याची आशा आहे.’’ नेतृत्वाच्या अभावामुळे पक्षाची वाताहत झाली काय, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘ज्योती बसूंसारखे लोकोत्तर नेतृत्व नेहमी तयार होत नाही. परंतु ‘माकप’चे संघटन अद्यापही शाबूत आहे. प्रत्येक गावात ‘माकप’चे कार्यकर्ते आहेत. या निवडणुकीत ‘माकप’ला नवी ऊर्जा मिळालेली दिसेल.’’

Loksabha Election
Rahul Gandhi : अंबानी-अदानींचे हित मोदींनी जपले ; रायबरेलीतील सभेमध्ये राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

सायरा शहा हलीम तरुण नेतृत्व

कोलकता शहरामध्ये सध्या सायरा शहा हलीम या तरुण नेतृत्वाची चर्चा आहे. उच्चशिक्षित असलेल्या सायरा शहा हलीम यांनी अल्पकाळात पक्षात आणि जनतेच्या मनात जागा निर्माण केली आहे. अभिनेते नसरुद्दीन शहा यांची पुतणी असलेल्या सायरा यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत ३० टक्के मते मिळविली होती. यापूर्वीच्या निवडणुकीत ‘माकप’ला येथे केवळ सहा टक्के मते मिळाली होती. यामुळेच कोलकता दक्षिण या महत्त्वाच्या मतदारसंघातून ‘माकप’ने त्यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाला तरुण नेतृत्वाची आवश्यकता असल्याची जाणीव झाल्याने उमेदवारी मिळाल्याचा दावा सायरा शहा हलीम यांनी सकाळशी बोलताना केला. ही निवडणूक ‘माकप’ला कलाटणी देणारी ठरणार आहे. भाजप आणि तृणमूलच्या जातीय व हिंसेच्या राजकारणाला जनता कंटाळली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

गर्दी खेचणाऱ्या नेत्याचा अभाव

‘माकप’कडे राष्ट्रीय चेहरा असलेले आणि गर्दी खेचून घेणारे नेतृत्व नसल्याने प्रचार सभांची संख्याही कमी झाली आहे. राज्यातील तरुण नेतृत्व भाजप आणि तृणमूलकडे गेल्याने प्रचारातही या पक्षाला कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे पश्चिम बंगालमध्ये पक्षातर्फे काढल्या जात असल्याचे रॅली व रोड शोमध्ये दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.