Sangli Lok Sabha : विशाल पाटलांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे काँग्रेस सावध; विश्‍वजित, पृथ्वीराज, सावंतांना नागपूरला पाचारण

सांगलीत आमदार विश्‍वजित कदम यांच्या हालचालींवर शिवसेनेचे विशेष लक्ष आहे.
Congress leader Vishal Patil Sangli Lok Sabha
Congress leader Vishal Patil Sangli Lok Sabhaesakal
Updated on
Summary

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत फेरविचार करावा, यासाठी विविध घटकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला आहे.

सांगली : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंडाचा झेंडा फडकावल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज प्रदेश काँग्रेस नेत्यांनी आमदार विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam), आमदार विक्रम सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना नागपूरला बोलावून घेतले आहे. बंडाच्या परिणामांची बैठकीत चर्चा होणार असल्याचे कळते.

Congress leader Vishal Patil Sangli Lok Sabha
बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचं कोणी धाडस केलं, तर राजकीय संन्यास घेऊ; उदय सामंतांचं मोठं विधान

यानिमित्ताने या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेच्या मेळाव्यापासून आणि विशाल यांच्या शक्तिप्रदर्शनापासून सुरक्षित अंतर ठेवले. आता प्रदेशच्या आदेशानंतर त्यांची पुढची दिशा स्पष्ट होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात हे आज रात्री नागपूरला पोचत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेते सांगलीतून हेलिकॉप्टरने मुंबईला व तेथून विमानाने नागपूरला रवाना झाले.

या नेत्यांनी विशाल पाटील यांनाही बोलावले होते. मात्र, उद्या त्यांचा मेळावा असल्याने त्यांनी जाणे टाळले आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी शिवसेनेच्या चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना जाहीर करण्यात आली आहे. त्या विरोधात विशाल पाटील यांनी बंडाची घोषणा केली असून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्याला काँग्रेस नेत्यांनी साथ द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे; परंतु महाविकास आघाडीकडून आघाडी धर्म पालनाची सक्ती केली जात आहे. काँग्रेसने सांगलीत वेगळा विचार केला, तर राज्यभर शिवसेना वेगळा विचार करेल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

Congress leader Vishal Patil Sangli Lok Sabha
Kolhapur Lok Sabha : 'पृथ्वीवरील कोणतीच शक्ती मंडलिकांचा विजय रोखू शकत नाही'; हसन मुश्रीफांचं थेट आव्हान

त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश नेते सावध आहेत. सांगलीत आमदार विश्‍वजित कदम यांच्या हालचालींवर शिवसेनेचे विशेष लक्ष आहे. राऊतांनी विश्‍वजित यांच्यावर सांगलीत येऊन टीका केली होती. विश्‍वजित यांनी त्याला उत्तर देणे टाळले होते. आता विशाल यांच्या बंडानंतर पुन्हा विश्‍वजित यांच्यावर नजरा खिळल्या आहेत. ते काय भूमिका घेणार, यावर बरेच चित्र अवलंबून असणार आहे. आमदार विक्रम सावंत आणि पृथ्वीराज पाटील यांची भूमिकादेखील विश्‍वजित यांच्या निर्णयावरच अवलंबून आहे.

या पार्श्‍वभूमीवर नागपूरमध्ये आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, रमेश चेन्नीथला आणि श्री. थोरात हे विश्‍वजित यांच्याशी बोलणार आहेत. सांगलीतील सध्याची स्थिती, चंद्रहार यांच्या प्रचारात काँग्रेसचा सहभाग, विशाल यांच्या बंडाची स्थिती, त्याचे परिणाम आदी विषयांवर बैठकीच चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रदेश काँग्रेसकडून महाविकास आघाडीचा धर्म पालन करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

Congress leader Vishal Patil Sangli Lok Sabha
भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजेंनी भरली अनामत रक्कम; 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता

शिवसेनेकडे शेवटचा प्रयत्न

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत फेरविचार करावा, यासाठी विविध घटकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला आहे. ‘भारत जोडो अभियान’ संघटना त्यासाठी आग्रही आहे. सोबतच, शिवसेना ठाकरे पक्षातील काहींनी वस्तुस्थिती पाहून पुनर्विचार करावा, असा प्रस्ताव मांडल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.