PM Narendra Modi : काँग्रेसच्या जाहीरनाम्याची तुलना मुस्लिम लीगशी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. ६ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी राजस्थानातील अजमेर येथील सभेला संबोधित करताना यासंदर्भाने टिपण्णी केली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसने तक्रार दाखल केली आहे.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाने प्रसिध्द केलेला जाहीरनामा हा त्या पक्षाचा आहे की पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुस्लिम लीगचा? असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेर येथे जाहीर सभेत बोलताना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली होती. त्यांचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीग आणि डाव्यांच्या कल्पनांचे पत्रक असल्याचे मोदी म्हणाले होते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रत्येक पानावर देशाच्या विभागनाची झलक दिसून येते, असा घणाघात मोदी यांनी केला होता.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?
अल्पसंख्यांकाची वेशभूषा, त्यांचे खानपान आणि त्यांच्या वैयक्तिक कायद्याला गॅरंटी दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेसने जाहीरनाम्यात दिले आहे. यावर भाजप आक्रमक झाली आहे. काँग्रेसने मागील आठवड्यात आपला जाहीरनामा प्रकाशित केला होता. त्यात शेतमालाला गॅरंटी, आरक्षित वर्गाची आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर नेणे, युवकांना रोजगार, पायाभूत सुविधांचा विकास, जातनिहाय जनगणना आदी मुद्द्यांवर भर देण्यात आला होता.
काँग्रेसचं भाजपला प्रत्युत्तर
काँग्रेसने जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनामा हा मुस्लिम लिगचा प्रभाव असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरसभेमध्ये केला होता. या आरोपाचे सविस्तर उत्तर सोमवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले. देशातील सामान्य लोकांच्या विकासासाठी तयार केलेल्या काँग्रेसच्या न्याय पत्राला मुस्लिम लिगशी जोडत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वजांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात लढलेल्या भारत छोडो आंदोलनाला विरोध केला होता.
1940 च्या दशकात मोदींच्या पूर्वजांनी मुस्लिम लिगशी संधान बांधून बंगाल, सिंध व एनड्ब्ल्यूएफपीमध्ये राज्य सरकारे स्थापन केली होती. जनसंघाचे पहिले अध्यक्ष श्यामप्रसाद मुखर्जी यांनी इंग्रजांना पत्र लिहून भारत छोडो आंदोलन कसे कमजोर करता येईल, यासाठी इंग्रजांना सहकार्य करण्याची भाषा श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली होती. या विचारधारेचे पाईक असलेले पंतप्रधान मोदी यांना आता मुस्लिम लिगशी असलेल्या ऋणानुबंधांची आठवण येत असावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.