Rashmi Barve: काँग्रेसच्या रश्मी बर्वेंचा अर्ज अखेर बाद! आता 'हा' असणार रामटेकचा अधिकृत उमेदवार

Loksabha Election 2024 : जात प्रमाणपत्र पडताळणीत अपात्र ठरल्यानं बर्वे यांच्यावर ही नामुष्की ओढवली.
Rashmi Barve
Rashmi Barve
Updated on

Loksabha Election 2024 Marathi News : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीत अपात्र ठरल्यानं बर्वे यांच्यावर ही नामुष्की ओढवली. यानंतर काँग्रेसनं दिलेल्या दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज मात्र पात्र ठरला आहे. त्यामुळं हा दुसरा उमेदवारचं आता काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असणार आहे. (Congress Ramtek candidate Rashmi Barve nomination declared invalid now Shyam Kumar Barve would official candidate of congress)

Rashmi Barve
Jayant Patil: "जयंत पाटलांपेक्षा गोविंदा चांगला कलाकार"; CM एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं रश्मी बर्वे यांची उमेदवारी जाहीर केली होती. पण याचदरम्यान त्यांचा जात पडताळणीचा अहवाल आला, यात जात प्रमाणपत्र अपात्र ठरलं. यामुळं बर्वे यांच्या अडचणीत वाढ झाली होती आणि त्यांची उमेदवारी बाद होणार अशी चर्चा सुरु झाली. त्यानुसार अपेक्षेप्रमाणं रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांनी बाद ठरवला. यासाठी त्या जात पडताळणीत अपात्र ठरल्याचा निकष लावला गेला. (Latest Marathi News)

दरम्यान, रश्मी बर्वे यांचा अर्ज जरी बाद झाला असला तरी निवडणूक आयोगानं रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरवला. त्यामुळं श्यामकुमार बर्वे हे आता काँग्रेसचे नवे अधिकृत उमेदवार असणार आहेत, अशी माहिती रामटेकच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. (Latest Marathi News)

रामटेक मतदारसंघात महायुतीकडून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पारवे हे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे या दोघांमध्ये आता इथं प्रमुख लढत होईल. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसुचित जातीसाठी राखीव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.