Loksabha Election : चारशेपार सोडाच, दोनशेपार कठीण ; आदित्य ठाकरे यांची टीका,खारघरमध्ये वाघेरे यांच्या प्रचारार्थ रोड-शो

‘‘लोकसभा निवडणुकीत आत्तापर्यंत झालेल्या मतदानानंतर हाती येणारे अंदाज पाहता इंडिया आघाडीकडे मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे.
Loksabha Election
Loksabha Election sakal

पिंपरी/पनवेल : ‘‘लोकसभा निवडणुकीत आत्तापर्यंत झालेल्या मतदानानंतर हाती येणारे अंदाज पाहता इंडिया आघाडीकडे मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ४०० तर सोडा, २०० पार जाणं सुद्धा भारतीय जनता पक्षाला कठीण असेल,’’ असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (ता.९) सांगितले.

मावळ लोकसभा मतदारसंघामधील महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ पनवेल-खारघर येथून आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना उपनेते, आमदार सचिन अहीर, जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिरीष घरत, सुदाम गोकुळ पाटील, वैभव सावंत, कल्पना पाटील आदी उपस्थित होते.

Loksabha Election
Supriya Sule : धमकी दिल्यास करेक्ट कार्यक्रम ; सुप्रिया सुळे यांचा इशारा, मंचरमधील सभेत भाजपवर निशाणा

उद्योगधंदे गुजरातला पळविले : आदित्य ठाकरे

ठाकरे म्हणाले, ‘‘अगदी जून २०२२ पर्यंत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना असे वाटत होते की वेदांता फॉक्सकोन महाराष्ट्रातच राहील. त्यांनी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरप्रमाणे वक्तव्य केले होते. कारण, त्यांच्या आजूबाजूला नेहमी कॉन्ट्रॅक्टर असतात. तळेगाव येथे होणारा हा प्रकल्प पुढे गुजरातला गेल्यानंतर तो देशाबाहेर निघून गेला.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com