Dharashiv Loksabha Result : धाराशिवमध्ये पुन्हा ओमराजेच;विक्रमी मतांनी मशाल उजळली

सत्तापक्षाचा एक मंत्री आणि नऊ आमदार विरोधात असतानाही विक्रमी फरकाने ही निवडणूक त्यांनी अगदी एकहाती जिंकली आहे.
Dharashiv Loksabha Result
Dharashiv Loksabha Result sakal
Updated on

धाराशिव : धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघात सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा विक्रमी मताधिक्याने पराभव करत विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी सत्तापक्षाच्या चिंधड्या उडविल्या.

सत्तापक्षाचा एक मंत्री आणि नऊ आमदार विरोधात असतानाही विक्रमी फरकाने ही निवडणूक त्यांनी अगदी एकहाती जिंकली आहे. आपापल्या विधानसभा मतदारसंघांतून लाखाची आघाडी देण्याच्या वल्गना करणारे सत्तापक्षांचे आमदार आणि अन्य पुढारी यामुळे उघडे पडले आहेत. दिमतीला भाजपची प्रचार यंत्रणा आणि कार्यकर्त्यांची फळी असतानाही त्यांचा दारुण पराभव झाला.

मागील लोकसभा निवडणुकीत आणि त्यापूर्वीच्या निवडणुकीत अनुक्रमे राणाजगजितसिंह पाटील आणि डॉ. पद्मसिंह पाटील या पुत्र आणि पित्याचा सलग पराभव झाला होता. त्यांनाही चार लाखांहून अधिक मते मिळाली होती.

तरीही त्यांचा पराभव झाला होता. तेव्हा मोदी फॅक्टर आणि वंचितमुळे हा पराभव झाल्याचे मानले जात होते. आताही महायुतीतून राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवार अर्चना पाटील यांना जवळपास तेवढीच मते मिळाली आहेत.

त्यात अजिबात वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. यामुळे अर्चना पाटलांना त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची फारशी मते पडली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचाही प्रभाव दिसला नाही.

दुसऱ्या बाजूला केवळ सामान्य मतदार सोबत असताना मतदारांच्या बळावर निवडणूक लढवीत ती अगदी एकतर्फी ओमराजे यांनी जिंकली आहे. सामान्य मतदारांनीच ही निवडणूक हाती घेतली होती.

Dharashiv Loksabha Result
Pune Loksabha Congress : काँग्रेसवर ‘हाता’ने अपयशाची वेळ

हे यामुळे समोर आले आहे. सामान्यातील सामान्य व्यक्तीपर्यंत ओमराजे यांचा असलेला अगदी सहज असा संपर्क आणि आक्रमक प्रचार हा मुख्यत्वाने त्यांच्या कामी आल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

तीन उमेदवारांना २३ व्या फेरीअखेर मिळालेली मते

  • १) ओमप्रकाश राजेनिंबाळकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

    सात लाख ४५ हजार ३२४

  • २) अर्चना पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)

    चार लाख १७ हजार २५५

  • ३) भाऊसाहेब आंधळकर (वंचित बहुजन आघाडी )

    ३३ हजार २३३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()