Yusuf Pathan : निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रध्वजाचा वापर नको ; माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश

तृणमूल काँग्रेसचे बेरहामपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे टी-२० क्रिकेट विश्‍वकरंडकाच्या विजयाचे चित्र प्रचार फलकांवर लावण्यासही युसूफ पठाण यांना मनाई करण्यात आली आहे.
Yusuf Pathan
Yusuf Pathansakal
Updated on

बेरहामपूर : तृणमूल काँग्रेसचे बेरहामपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे टी-२० क्रिकेट विश्‍वकरंडकाच्या विजयाचे चित्र प्रचार फलकांवर लावण्यासही युसूफ पठाण यांना मनाई करण्यात आली आहे. ‘मुर्शिदाबाद’च्या जिल्हाधिकारी राजश्री मित्रा यांनी हे आदेश दिले आहेत.

‘तृणमूल’ने इंडिया आघाडीशी फारकत घेत पश्‍चिम बंगालमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीररंजन चौधरी यांच्या बेरहामपूर मतदार संघातून माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने येथील लढत लक्षवेधी झाली आहे.

दरम्यान, युसूफ पठादरम्यान, युसूफ पठाण यांच्या प्रचाराच्या फलकांवर टी-२० विश्‍वचषक विजयाचे आणि राष्ट्रध्वजाचे छायाचित्र वापरण्यात येत होते. यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्तांनी पठाण यांना राष्ट्रध्वज आणि टी-२० विश्‍वकरंडक विजयाचे छायाचित्र वापरण्यास मनाई केली आहे.

Yusuf Pathan
Loksabha Election 2024 : भाजपने दोनशे जागा जिंकून दाखवाव्यात ; ममता बॅनर्जी यांचे आव्हान

विश्वकरंडकाशी संपूर्ण देशाच्या भावना जोडल्या गेल्या आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रध्वजाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे , असे स्पष्ट करत निवडणूक आयोगाने पठाण यांना प्रचारादरम्यान या दोन्हींच्या वापरावर बंदी घातली आहे.ण यांच्या प्रचाराच्या फलकांवर टी-२० विश्‍वचषक विजयाचे आणि राष्ट्रध्वजाचे छायाचित्र वापरण्यात येत होते.

यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्तांनी पठाण यांना राष्ट्रध्वज आणि टी-२० विश्‍वकरंडक विजयाचे छायाचित्र वापरण्यास मनाई केली आहे. विश्वकरंडकाशी संपूर्ण देशाच्या भावना जोडल्या गेल्या आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रध्वजाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे , असे स्पष्ट करत निवडणूक आयोगाने पठाण यांना प्रचारादरम्यान या दोन्हींच्या वापरावर बंदी घातली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.