'सध्या मी कुठल्याही पक्षात नाही. त्यामुळे बंडखोरी हा शब्द आपल्याला लागू होत नाही.'
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle Lok Sabha Constituency) शिवसेनेने (ठाकरे गट) कडून लढावे, अशी ऑफर दिली आहे. परंतु त्याला नम्रपणे नकार दिला आहे. महिन्याभरात सुमारे बाराशे गावांमध्ये जाणे अशक्य आहे. गेल्या अडीच वर्षांपासून आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तयारी करत आहे. त्यामुळे या मतदारसंघातूनच रिंगणात असणार आहे. ते उमेदवारीच्या माध्यमातून की अन्य कोणत्या मार्गाने हे आठ-दहा दिवसात स्पष्ट होईल, असे गोकुळ दुध संघाचे (Gokul Dudh Sangh) संचालक डॉ. चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. नरके (Dr. Chetan Narake) म्हणाले, ‘अडीच वर्षात कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघात १२५५ गावात संपर्क केला आहे. ठाकरे घराण्याचे आपल्यावर प्रेम आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला असता तर नक्कीच आपल्याला उमेदवारी मिळाली असती. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी आपल्याला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली आहे. त्याला नम्रपणे नकार दिला.
महिन्याभरात या मतदारसंघातील सुमारे १२०० गावांमध्ये पोहोचणे शक्य होणार नाही. परंतु आपण कोल्हापूर लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात असणार आहे. ते कसे असणार हे येत्या आठ ते दहा दिवसात स्पष्ट होईल. दरम्यान चार पक्षांनी आपल्याशी संपर्क साधला आहे. सध्या मी कुठल्याही पक्षात नाही. त्यामुळे बंडखोरी हा शब्द आपल्याला लागू होत नाही. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे वडिलधारे असून, त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.