Eknath Shinde : कासवगतीने मतदानाची चौकशी करा : शिंदे

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईतील अनेक भागांत कासवगतीने मतदान झाल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Eknath Shinde
Eknath Shinde sakal
Updated on

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईतील अनेक भागांत कासवगतीने मतदान झाल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

कासवगतीने झालेले मतदान, मतदानावेळी झालेला गोंधळ, कडक उन्हाचा त्रास सहन करत मतदारांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले, यामुळे काही जण मतदान न करताच परत गेल्याचेही प्रकार घडले.यामुळे मतदानावर परिणाम झाल्याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

यावेळी पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने पुरेशी काळजी घेतली नव्हती का, मतदान टक्केवारी कमी का झाली, प्रशासन कुठे कमी पडले, याची तत्काळ चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

राज्यात आधीच्या चार टप्प्यांच्या तुलनेत पाचव्या टप्प्यात सर्वांत कमी मतदान झाले आहे. विशेषत: मुंबईतील अनेक मतदारसंघांत मोठा घोळ झाल्याचे दिसून आले. अनेक केंद्रांवर मतदार याद्यांमध्ये नाव नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. तर, मतदान प्रक्रिया संथ असल्याने मतदान केंद्राबाहेर रांगाच रांगा लागल्याचेही दिसून आले होते.

भाजपला पराभवाची भीती : राऊत

खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी भाजपवर निशाणा साधला. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पराभवाची खात्री झाल्याने त्यांनी मतदान यंत्रणा बिघवडवल्याचा आरोप राऊत यांनी केला. पण जनतेने चिकाटीने मतदान केले. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.