Eknath Shinde : राज्यातील महायुतीचे सरकार रोजगार देणारे ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन,नसरापूर येथे प्रचारसभा

राज्यातील महायुतीचे सरकार हे रोजगार देणारे सरकार असून, भोर तालुक्यातील उत्रौली येथे एमआयडीसीची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देणार आहे,’’ असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
Eknath Shinde
Eknath Shindesakal

भोर : ‘‘राज्यातील महायुतीचे सरकार हे रोजगार देणारे सरकार असून, भोर तालुक्यातील उत्रौली येथे एमआयडीसीची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देणार आहे,’’ असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी चेलाडी-नसरापूर (ता. भोर) येथे बुधवारी (ता. १) सायंकाळी झालेल्या सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतारे, रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, बाळासाहेब चांदेरे, अप्पा सोनवले, सुनील चांदेरे, संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, यशवंत डाळ, जीवन कोंडे, सचिन मांडके, शरद ढमाले, सचिन कन्हेरकर, राजेंद्र मोरे यावेळी उपस्थित होते.

Eknath Shinde
Loksabha Election 2024 : ‘व्होट जिहाद’ हीच ‘इंडिया’ची रणनीती ; आणंदमधील सभेत पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

यावेळी कुलदीप कोंडे म्हणाले, ‘‘भोरचे आमदार व खासदार हे पाच वर्षे भांडतात, एकमेकांना काळे झेंडे दाखवितात, विकासकामांचा श्रेयवाद करतात आणि निवडणुकीच्या वेळी एकत्र येऊन जनतेची दिशाभूल करतात.’’

राज्यातील महायुतीचे सरकारमध्ये मी पहाटेपर्यंत काम करतो, अजित पवार पहाटेपासूनच कामाला सुरुवात करतात. देवेंद्र फडणवीस दिवसभर काम करतात. त्यामुळे आमचे सरकार हे २४ बाय ७ कामे करीत आहे.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

  • घरातील मुलगी आणि सून यामध्ये भेदभाव करणाऱ्यांना निवडून देऊ नका.

  • ४०० जागा घेतल्यावर भाजप संविधान बदलणार, असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू.

  • मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणांचे स्मारकात रूपांतर केले, संविधानात बदल केला जाणार नाही.

  • गुंजवणी धरण प्रकल्पातील शिवगंगा खोरे, वांगणी व वाजेघर खोऱ्यातील पाणीयोजना पूर्ण करणार.

अजित पवार म्हणाले...

  • भोर, वेल्हे व मुळशीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी उपक्रम राबविणार.

  • भोरमधील एमआयडीचा प्रश्न मार्गी लावणार आणि भोर ते वाई बोगद्यासाठी कार्यवाही करणार.

  • वेल्हे तालुक्यात कुस्ती संकुल उभारणार, नसरापूर-वेल्हे-मढे घाट मार्ग पूर्ण करणार.

  • भाटघर धरणातील वाकांबे ते वेळवंड या पुलाचे काम करणार.

  • नीरा-देवघरच्या डाव्या कालव्यासहीत प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबीत प्रश्न सोडविणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com