पुणे : ‘ट्रम्पेट’चा अर्थ मराठीत ‘तुतारी’ असा होत नाही. त्यामुळे तो शब्द बदलून दुसरा प्रतिशब्द द्यावा, अशी मागणी बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोमवारी केली. त्यासाठी त्यांनी हरकतीचा अर्जही दाखल केला.
सुळे यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे निवडणूक चिन्ह दिले आहे. मात्र याच मतदारसंघात अपक्ष उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांना निवडणूक आयोगाने ‘ट्रम्पेट’चे चिन्ह दिले आहे. त्याला मराठीत ‘तुतारी’ असा शब्द दिला आहे. त्याला खाबिया यांनी आक्षेप घेतला आहे. दोन्ही चिन्हांच्या नावांमध्ये साधर्म्य आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडू शकतो. ‘
ट्रम्पेट’ला पर्यायी मराठी शब्द द्यावा, अशी मागणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या चिन्ह वाटपाच्या बैठकीत निवडणूक आयोगाकडे त्यांनी केली. या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाने २० एप्रिलला ‘तुतारी’ शब्दाबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही, असेही खाबिया यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले आहे.
‘बघतोय रिक्षावाला’तर्फे अपक्ष उमेदवार
बारामती लोकसभा मतदारसंघात ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेतर्फे अपक्ष उमेदवार म्हणून शरद राम पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना ‘जेवणाचे ताट’ चिन्ह मिळाले आहे. ‘आम्ही डमी उमेदवार नाही; नाही तर फ्री सिंम्बॉलपैकी एक तुतारी हेसुद्धा आम्ही मागू शकलो असतो. परंतु आम्हाला फसवणूक करून नको; तर सत्यावर प्रामाणिकपणे मतदान हवंय,’ असे पवार यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.