Raj Thackeray: मराठीला अभिजात दर्जा, मराठ्यांचा इतिहास अन् मुंबई-गोवा महामार्ग...; राज ठाकरेंनी मोदींकडं व्यक्त केल्या ७ अपेक्षा

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर आले होते.
mns raj thackeray support bjp modi shah vote lok sabha election 2024 politics
mns raj thackeray support bjp modi shah vote lok sabha election 2024 politicsSakal
Updated on

मुंबई : मुंबईत शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं त्याचबरोबर त्यांच्याकडं ७ मागण्याही केल्या. (Elite status of Marathi history of Marathas and Mumbai Goa highway Raj Thackeray made 7 demands to PM Modi)

राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेचं राम मंदिर शक्य झालं. त्याचबरोबर कलम ३७० हटवण्याचं केवळ स्वप्न राहिलं असतं ते देखील त्यांनी पूर्ण करुन दाखवलं. तसंच तिहेरी तलाकचा कायदाच त्यांनी रद्द करुन टाकला. हे खरंतर त्यांचे अतिशय धाडसी निर्णय होते.

mns raj thackeray support bjp modi shah vote lok sabha election 2024 politics
Swati Maliwal: स्वाती मालिवाल भाजपच्या षडयंत्राचा भाग; 'आप'कडून घणाघाती आरोप

यावेळी राज ठाकरे यांनी मोदींकडं मराठी माणसाकडून असलेल्या काही अपेक्षा व्यक्त केल्या. त्यापैकी पहिली अपेक्षा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. पंतप्रधान झाल्यानंतर ही अपेक्षा पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर दुसरा विषय देशाच्या अभ्यासक्रमात देशात मराठ्यांचं जे सव्वाशे वर्षे मराठ्यांचं साम्राज्य होतं त्यांचा समावेश शालेय जीवनापासून करावा. तिसरा विषय समुद्रात शिवछत्रपतींचा पुतळा उभा रहावा, तसेच शिवरायांच्या गडकिल्ल्यांना पूर्वीच वैभव परत प्राप्त व्हावं यासाठी एक आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करण्याचीही मागणी त्यांनी केली. त्यानंतर गेल्या १८-१९ वर्षे मुंबई-गोवा महामार्ग हा अजूनही खड्ड्यात आहे तो लवकरात लवकर व्हावा.

mns raj thackeray support bjp modi shah vote lok sabha election 2024 politics
Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

तसेच संविधान बदलणार असल्याचा जो विरोधक प्रचार करत आहेत, त्यांची तोंड तुम्ही कायमची बंद करावीत. ओवैसींसारखे जे अड्डे आहेत ते एकदा तपासून घ्या, तिथं माणसं घुसवा, देशाचं सैन्य घुसवा आणि हा देश कायमचा सुरक्षित करुन टाका, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. शेवटची अपेक्षा व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, मुंबईची लोकल ट्रेनच्या यंत्रणेवर केंद्र सरकारनं बारीक लक्ष द्याव, निधी द्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.