Modi on Constitution: "खुद्द बाबासाहेब आंबेडकर आले तरी संविधान संपवू शकत नाहीत"; PM मोदींचं विरोधकांना उत्तर

राजस्थानातील बारमर इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर सडकून टीका केली.
PM Modi at Barmer
PM Modi at Barmer
Updated on

नवी दिल्ली : खुद्द बाबासाहेब जरी आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानातील बारमर इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी बाबासाहेब आणि संविधानाचा अपमान केला असा आरोपही केला. (Even if Babasaheb Ambedkar himself comes he cannot abolish Constitution it is Gita Quran Bible for govt says PM Modi)

मोदी म्हणाले, "एससी, एसटी आणि ओबीसींसोबत अनेक दशकांपासून भेदभाव करणारा काँग्रेस पक्ष आजकल एक जुनी रेकॉर्ड वाजवत आहे. जेव्हा पण निवडणूक येते त्यानंतर संविधानावरुन खोटं बोलणं ही इंडिया आघाडीची फॅशन झाली आहे. ती काँग्रेस जिनं बाबासाहेब हयात असताना त्यांना निवडणुकीत हारवलं. ज्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न मिळू दिला नाही. (Latest Marathi News)

PM Modi at Barmer
Tipu Sultan Poster: नाशिकच्या सिडकोत टिपू सुलतानच्या बॅनरनं खळबळ; पोलिसांचा हस्तक्षेप

त्या काँग्रेसनं देशात आणिबाणी लागू करुन संविधान संपवण्याचा प्रयत्न केला आज तिच काँग्रेस मोदीला शिव्या देण्यासाठी संविधानाच्या आडून खोटं बोलत आहे. हे ते मोदी आहेत ज्यांनी देशात पहिल्यांदा संविधान दिन साजरा करणं सुरु केलं. पण याला काँग्रेसवाल्यांनी विरोध केला होता. संसदेतलं भाषण आहे त्यांचं. हा बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान आहे की नाही.

PM Modi at Barmer
Student Beaten by Teacher: पुण्यात शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल

इतकंच नाही हे मोदी आहेत ज्यांनी बाबासाहेबांशी संबंधित पंचतीर्थांचा विकास केला. त्यामुळं बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खोटारडेपणामुळं सावध राहण्याची गरज आहे. काँग्रेसनं हे लक्षात ठेवावं की हे ४०० जागांचं ध्येय जनतेनं यासाठी ठेवलं आहे की, तुम्ही १० वर्षे मला चांगलं काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं देश तुम्हाला शिक्षा देऊ इच्छितं आणि साफ करु इच्छित आहे. (Marathi Tajya Batmya)

PM Modi at Barmer
Paper Check: पेपर तपासताना झाल्या प्रचंड चुका! शिक्षकांकडून वसूल केले अडीच कोटी रुपये

जिथंपर्यंत संविधानाचा प्रश्न आहे. मोदींचे शब्द तुम्ही लिहून ठेवा की खुद्द बाबासाहेब आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत. सरकारसाठी संविधान हे गीता, रामायण, महाभारत, बायबल आणि कुराण आहे. भारताविरोधात इंडिया आघाडीवाले किती द्वेषानं भरलेले आहेत, ते पाहा," असंही मोदींनी यावेळी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()