नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीत काय चर्चा झाली तसेच इंडिया आघाडीला किती जागा मिळतील याचा आकडा जाहीर केला. त्यानुसार, इंडिया आघाडीला २९५ पेक्षा अधिक जागा मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे. (Exit Poll told by Congress President Mallikarjun Kharge India bloc will get 295 seats)
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, भाजप आणि त्यांचे लोक आज एक्झिट पोलवर खूप चर्चा करतील, तसंच एक नरेटिव्ह तयार करतील. पण यावरुन लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही खरं काय आहे ते देशवासियांना सांगू इच्छितो. इंडिया आघाडीला २९५ पेक्षा अधिक जागा मिळतील कमी तर येणारच नाहीत. आमच्या आघाडीच्या सर्व नेत्यांच्या चर्चेनंतर आम्ही याचं आकलनं केलं आहे, त्यातून हा आकडा आम्हाला मिळाला आहे. यात काही बदल होईल असं वाटत नाही, असंही खर्गे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, त्याचबरोबर जनतेचा जो सर्व्हे आहे तो आमचा नाही. पण या सर्व्हेत हाच आकडा समोर आला आहे. सरकारी सर्व्हे देखील असतात त्यांच्याकडं अनेक अकडे समोर आणण्याचा आणि चढवून सांगण्याचे प्रकार घडू शकतात. पण आम्ही खरं काय ते जनतेसमोर ठेवत आहोत. आम्ही सर्वजण एकत्र आल्यानंतर हा आकडा तुमच्या समोर ठेवत आहेत.
त्याचबरोबर आम्ही निवडणूक आयोगात जाणार असून तिथं आम्ही सांगू की, आधी मतपत्रिकांवर मतदान झाल्यानंतर त्याची मोजणी व्हायची पण त्यात गडबडीची शक्यत्या निर्माण व्हायच्या. त्यामुळं आम्ही निवडणूक आयोगाकडं जाऊन आमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या सांगून त्याबाबत रिटर्निंग ऑफिसरला सूचना द्याव्यात अशी मागणी करणार आहोत, असंही खर्गे यांनी यावेळी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.