BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशातल्या १३ लोकसभा मतदारसंघांसह देशभरातल्या १११ लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार पक्षाने जाहीर केले आहेत.
भाजपने मेरठ लोकसभा मतदारसंघातून रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील रामाची भूमिका निभावलेले अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे. तर अभिनेत्री कंगना रणौत हिला हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची संधी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पीलीभीत मतदारसंघाचे विद्यमान खासदार वरुण गांधी यांचं तिकीट भाजपने कापलं आहे.
दिग्गजांचं तिकिट कापलं
भाजपने पाचव्या यादी जाहीर केली असून त्यातून दिग्गजांना नारळ दिल्याचं दिसून येत आहे. वरुण गांधी यांच्याजागी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले जितीन प्रसाद यांना तिकीट दिलं आहे.
तसेच गाझियाबाद मतदारसंघातून दोनवेळा खासदार असलेले व्हीके सिंह यांचं तिकीट कापून अतुल गर्ग यांना दिलं आहे. यादी जाहीर होण्यापू्र्वीच जनरल व्हीके सिंह यांनी सोशल मीडियावर निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती.
नवीन जिंदल यांना उमेदवारी
पाचव्या लिस्टमध्ये भाजपने हरियाणा येथील चार लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव आहे नवीन जिंदल आणि रणजीत चौटाला यांचं. कारण दोघांनी यादी घोषित होण्यापूर्वी काही तास अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला होता.
उत्तर प्रदेशातील उमेदवार
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून राघव लखनपाल, मुरादाबादमधून सर्वेश सिंग, मेरठमधून अरुण गोविल, गाझियाबादमधून अतुल गर्ग यांना उमेदवारी दिली आहे. तसेच अलिगढमधून सतीश गौतम, हाथरस (एससी) मतदारसंघातून अनुप वाल्मिकी, बदायूंमधून दुर्विजय सिंह शाक्य, बरेलीमधून छत्रपाल सिंग गंगवार, पीलीभीतमधून जितिन प्रसाद, सुलतानपूरमधून मनेका गांधी, कानपूरमधून रमेश अवस्थी, बाराबंकीमधून राजरानी रावत, बहराइचमधून अरविंद गोंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.