Loksabha Election 2024 : गड, किल्ले, पर्यावरण संवर्धन, विकास ठरतोय प्रचाराचा मुद्दा

गेल्या अनेक निवडणुकांमध्ये रस्ते, वीज, पाणी, बेरोजगारी, शेती, बाजारभाव या मुद्द्यांवर लढणाऱ्या निवडणुकांमध्ये आता गड, किल्ले, पर्यावरण संवर्धन आणि विकास हा प्रचाराचा मुद्दा होऊ लागला आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal
Updated on

पुणे : गेल्या अनेक निवडणुकांमध्ये रस्ते, वीज, पाणी, बेरोजगारी, शेती, बाजारभाव या मुद्द्यांवर लढणाऱ्या निवडणुकांमध्ये आता गड, किल्ले, पर्यावरण संवर्धन आणि विकास हा प्रचाराचा मुद्दा होऊ लागला आहे. तर विविध राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात या मुद्द्यांचा समावेश केल्याने गडप्रेमींकडून याचे स्वागत केले जात आहे.

राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या पिढ्या बदलू लागल्या असून, प्रचाराचे मुद्दे देखील बदलत आहेत. २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. या पक्षाने पारंपारिक राजकारणाला कलाटणी देत, तरुणांना आकर्षित करण्यासाठी ‘होय हे शक्य आहे’ या टॅगलाईन खाली २०१४ मध्ये महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली.

या ब्ल्यू प्रिंटमध्ये रस्ते, वीज, पाणी, शेती, नगरविकास, पर्यावरण, पर्यटन, साहित्य संस्कृती आदी विविध क्षेत्राच्या विकासाचा आराखडा बनविला. यामध्ये महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापनेचा विषय घेऊन, सविस्तर आराखडा तयार केला. यानंतर मात्र विविध राजकीय पक्षांनी गड, किल्ले, पर्यावरण संवर्धन हा निवडणूक जाहीरनामा आणि प्रचाराचा मुद्दा केला.

भाजपने २०१९ च्या निवडणुकीमध्ये शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागत मते मागितली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने माजी खासदार संभाजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली राजगड विकास प्राधिकरणाची स्थापना करून ६०० कोटींचा विकास आराखडा सुरू केला. तर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गड किल्ले संवर्धन समिती स्थापन करून, गड किल्ले संवर्धनाला चालना दिली.

यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी गड किल्ले संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संकल्प कक्ष सुरू करून गड किल्ले संवर्धनाची काम सुरू ठेवले. पुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषेदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे हे कार्याध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समिती स्थापन करून, यामध्ये गड किल्ले आणि पुरातत्त्व वारसा ही स्वतंत्र उपसमिती स्थापन करून, धोरण निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 : दशकांनंतर नक्षलग्रस्त भागातील नागरिक प्रथमच करणार मतदान

शिवनेरी विकास निवडणुकीचा मुद्दा

माजी आमदार शरद सोनवणे यांच्या प्रयत्नांमुळे जुन्नर तालुक्याला राज्यातील पहिल्या पर्यटन तालुक्याचा दर्जा देण्यात आला. तालुक्यात असणाऱ्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबरच पर्यटन विकासाचा मुद्दा आता राजकीय आणि प्रचाराचा मुद्दा झाला असून, पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोन हजार कोटींचा एकात्मिक विकास आराखडा करण्याचे काम सुरू आहे.

यासाठी केंद्र सरकारकडून देखील निधी आणण्याचे आश्‍वासन लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे देत आहेत. यामुळे या निवडणुकीमध्ये पर्यटन विकास हा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे पर्यावरणावर प्रश्‍न मांडत असतात. राज ठाकरे यांच्या नगरविकासाबाबतची सौंदर्यदृष्टी बाबतची चित्रफीत युट्यूबर प्रसिद्ध आहे. तर आदित्य ठाकरे देखील पर्यावरणाचे प्रश्‍न मांडत असतात.

Loksabha Election 2024
Narendra Modi : काँग्रेसची भाषा विभाजनवादी ; चंद्रपुरातून फोडला प्रचाराचा नारळ,उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.