Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024: गडचिरोली-चिमूर मतदारसंघात काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठा झटका!

Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024: भाजपनं विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024
Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024esakal
Updated on

Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024:  लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनं विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

काँग्रेस माजी आमदार नामदेव उसेंडी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. नामदेव उसेंडी हे २००९ मध्ये काँग्रेसकडून गडचिरोली विधानसभा मतदासंघांतून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ व २०१९ अशा दोन्ही वेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढली पण ते जिंकले नाही. यावर्षी ते पुन्हा काँग्रेसकडून इच्छूक होते पण त्यांना तिकीट नाकारले. त्यामुळे नामदेव उसेंडी यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे.

राजीनामा दिल्यानंतर नामदेव उसेंडी यांनी नागपूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024
Video: 'काय सांगता! फाफने हे केलंय...?', RCB च्या कर्णधाराने असं काय केलं की विराटसह सर्वच खेळाडू शॉक

नामदेव उसेंडी म्हणाले,  अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व प्रदेश महासचिव काँग्रेसच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, मी गडचिरोली जिल्ह्याचा स्थानिक उमेदवार म्हणून पक्षाकडे गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राची उमेदवारी मागितली होती, स्थानिक व राज्य पातळीवरचा माझा काम पाहून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु स्थानिक व राज्य पातळीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने षडयंत्र करुन या लोकसभा क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची उमेदवारी देण्यात आली. (Latest Marathi News)

क्षेत्राबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने या स्थानिक नेतृत्वावर अन्याय झालेला आहे. पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसचे स्थानिक व राज्यपातळीवर नेतृत्व फक्त गटबाजीने ग्रस्त असल्यामुळे न्याय देवू शकत नसेल तर या क्षेत्रातील लोकांना न्याय कसा मिळेल मा बाबीचा विचार करुन कॉग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे, असे नामदेव उसेंडी म्हणाले.

Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024
Shirur Lok Sabha 2024: अजित पवार गटाचा दुसरा उमेदवार ठरला! शिरूरमध्ये आढळराव पाटलांचा पक्षप्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.