Loksabha Election : गिरीश महाजनांनी घेतली नाराज भुजबळांची भेट;दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील जाहीर सभेत जोरदार भाषण ठोकून टाळ्या मिळविणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी अद्यापही कायम आहे. त्यामुळे भाजपचे ‘संकटमोचक’ समजले जाणारे गिरीश महाजन हे पुन्हा भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी पोहोचले.
Loksabha Election
Loksabha Electionsakal
Updated on

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील जाहीर सभेत जोरदार भाषण ठोकून टाळ्या मिळविणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी अद्यापही कायम आहे. त्यामुळे भाजपचे ‘संकटमोचक’ समजले जाणारे गिरीश महाजन हे पुन्हा भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी पोहोचले.

दोन्ही नेत्यांची बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. नाराजी नसल्याचा निर्वाळा देताना महायुती म्हणून सक्रिय झाल्याचा दावा दोघांनीही केला. नाशिक मतदारसंघातून भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते. परंतु महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी जाहीर केली.

त्यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर आदी नेत्यांनी भुजबळ यांची भेट घेतली होती. नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये भुजबळ यांनी ज्या पद्धतीने प्रचारात सहभागी होऊन काम करणे अपेक्षित आहे तसेच काम होत नसल्याने महाजन यांनी आज पुन्हा भुजबळ यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

शांतिगिरी महाराज संपर्कात

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज व मी संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट महाजन यांनी यावेळी केला. त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र निवडणुकीतून माघार घेणार नाहीत हेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात इतर ठिकाणी महाराजांचे आशीर्वाद असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.