Gudhi Padva: राज्यात गुढी पाडव्याचा उत्साह; मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरात शोभायात्रेच आयोजन, शिंदे-फडणवीसांची हजेरी

मुख्यमंत्री, फडणवीस, श्रीकांत शिंदे यांसाह विविध राजकीय नेते या शोभायात्रेत सहभागी झाले असून प्रचारही केला.
Gudi Padva
Gudi Padva
Updated on

नवी दिल्ली : राज्यात आज मराठी नववर्षाच्या आणि साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याचा सर्वत्र उत्साह पहायला मिळतो आहे. यानिमित्त मुंबईतील गिरगाव, डोंबिवली भागात तसेच पुणे, नागपूर इथं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. त्यांनी जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची संधीही सोडली नाही. (gudhi padva excitement in maharashtra processions organized in mumbai thane pune pagpur politicians also present)

Gudi Padva
अमोल किर्तीकर यांच्या ईडी चौकशीत नेमकं काय काय घडलं? कोण कोणते मुद्दे आले समोर? घ्या जाणून

मुंबईतील मराठी जनांचा भाग असलेल्या गिरगावात दरवर्षी गुढी पाडव्यानिमित्त शोभायात्रांचं आयोजन केलं जातं. यामध्ये नऊवारी साड्यांसह नाकात नथ, केसात गजरा, गळ्यात साज, डोक्यावर रंगबिरंगी फेटे, डोळ्यावर गॉगल अन् बुलेटवर स्वार होऊन महिला आणि तरुणी या शोभायात्रेत मोठ्या उत्साहानं सहभागी झाल्या आहेत. त्यामुळं मुंबईत दरसालप्रमाणं यंदाही गुढी पाडव्याचा उत्साह कायम आहे. (Latest Maharashtra News)

Gudi Padva
CEO Salary: सीईओंच्या पगारात झाली भरघोस वाढ; भारतात कंपन्यांच्या सीईओचा पगार किती?

यामध्ये पुरुष मंडळीही पारंपारिक कुर्ता पायजमा असा वेश परिधान करुन ढोल-ताशांच्या गजरात या शोभा यात्रांमध्ये उत्साह भरत आहेत. या सर्व सळसळत्या उत्साहाचं वातावरण पाहण्यासाठी तसेच आपल्या मोबाईलच्या कॅमेरॅत कैद करण्यासाठी सामान्य नागरिकांची आणि माध्यमांची तिथं मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. (Marathi Tajya Batmya)

Gudi Padva
Latest Marathi News update : राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा ते BRS नेत्या के. कविता यांच्या कोठडीत वाढ, दिवसभरात काय घडलं?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात गुढी पाडव्यानिमित्त निघालेल्या शोभायात्रेत सहभाग नोंदवला. त्यांनी यावेळी कौपिनेश्वर मंदिरातील पालखी सोहळ्यात उपस्थिती नोंदवली. यावेळी शिंदे म्हणाले, काल महाराष्ट्रात मोदींच्या सभेनं प्रचाराला सुरुवात झाली आहे. ती इतकी विराट सभा होती ती विजयाची नांदी ठरेल. त्यामुळं महाराष्ट्रात देखील वेगळं वातावरण यानिमित्त सुरु झालं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काही ठिकाणचे उमेदवार जाहीर करणं बाकी आहे, लवकरच त्यावर निर्णय होईल. महायुती समन्वयानं काम करते आहे. महाविकास आघाडीसारखी बिघाडी आमच्यात नाही. (Latest Marathi News)

Gudi Padva
Yogi Adityanath: "मतदान करा अन् अयोध्या दर्शनासाठी या", गडकरींच्या प्रचारात योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

फडणवीस म्हणाले, गुढी पाडवा हा लहानपणापासून आम्ही साजरा करतो, गुढी उभारतो. हा आनंदाचा दिवस असतो. गेल्या काही दिवसांपासून या शोभायात्रांच्या माध्यमातून अत्यांत हर्षोउल्हासात हा सण साजरा होतो. प्रभू श्रीरामाचं मंदिर उभं राहिल्यानंतरचा हा पहिला पाडवा. गुढी उभारायचा आनंद आहे. त्यामुळं श्रीरामाच्या आशीर्वादानं आणि मोदींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात निश्चितपणे विजयाची गुढी उभारली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.