Harshvardhan Jadhav : ...तर अपक्ष म्हणून लढणार ; हर्षवर्धन जाधवांनी संभाजीनगरच्या लढाईत घेतली उडी

वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लढविण्यास इच्छुक असून तशी विनंतीही आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना केली आहे.
Harshvardhan Jadhav
Harshvardhan Jadhavsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लढविण्यास इच्छुक असून तशी विनंतीही आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना केली आहे. तसेच शांतीगिरी महाराजांनाही ‘आशीर्वाद’ देण्याची विनंती केली आहे.

दोघांकडून सहकार्य न झाल्यास अपक्ष का होईना, लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढविणारच, असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

Harshvardhan Jadhav
Mahadev Jankar : पक्ष-चिन्हाबाबत तडजोड नाही

जाधव यांनी मागील काही दिवसांपूर्वी ‘बीआरएस’ पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान बीआरएसमधून लढणार का? या प्रश्‍नावर त्यांनी बीआरएसकडून लोकसभा, विधानसभा लढविता येत नाही, असे म्हणत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

आपणास अर्जच मिळत नसेल तर कसे लढणार?, असा प्रतिप्रश्‍नच जाधव यांनी केला. एकाही प्रस्थापित पक्षासोबत जाणार नाही. जनतेने साथ दिली तर केंद्रात जाऊन मराठा आरक्षण टिकवून दाखवेन. शिवाय मी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात आलो असून माझे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या आत आल्याचे पुरावेही देतो, जनतेच्या मनात मी असेल तर मला चांगले काम करता येईल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.