'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

आपणाला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे.
Hatkanangale Lok Sabha Kadaknath Chicken
Hatkanangale Lok Sabha Kadaknath Chickenesakal
Updated on
Summary

माजी मंत्री सदाभाऊ खोत भाषणाला उभे राहिल्यानंतर उदगावमधील संदीप भंडारे याने खोत यांचे भाषण थांबवत ‘आधी ‘कडकनाथ’चे बोला, शेतकऱ्यांचे पैसे परत द्या’, असे सुनावले.

जयसिंगपूर : ‘‘कडकनाथ’चे (Kadaknath Chicken) बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या,’ असा थेट सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना उदगाव (ता. शिरोळ) येथे संदीप भंडारे या युवकाने विचारला. श्री. खोत यांचे भाषण सुरू असतानाच भर सभेत हा प्रकार घडल्याने व्यासपीठावरील मान्यवरांची तारांबळ उडाली.

Hatkanangale Lok Sabha Kadaknath Chicken
Sangli Lok Sabha : 'चंद्रहार पाटलांना विजयी केले, तर विश्‍वजित कदमांना वाघ ही पदवी देऊ'; संजय राऊतांची मोठी घोषणा

मात्र श्री. खोत यांनी प्रसंगावधान राखत ही विरोधकांची खेळी असल्याचे सांगत वेळ मारून नेली. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कर्मभूमी असणाऱ्या उदगाव येथे धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Hatkanangale Lok Sabha Kadaknath Chicken
Hatkanangale Lok Sabha : राजू शेट्टींच्या प्रचारासाठी बच्चू कडू मैदानात; जाहीर सभेत म्हणाले, हिंदू-मुस्लिम संकटात नाहीत तर..

या वेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत भाषणाला उभे राहिल्यानंतर उदगावमधील संदीप भंडारे याने श्री. खोत यांचे भाषण थांबवत ‘आधी ‘कडकनाथ’चे बोला, शेतकऱ्यांचे पैसे परत द्या’, असे सुनावले. यावर क्षणभर खोत यांची तारांबळ उडाली. मात्र त्यांनी ही विरोधकांची खेळी असल्याचे सांगत, ‘आपणाला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ,’ असे सांगत वेळ मारून नेली. या सभेतील हा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.